Follow Us @soratemplates

Thursday, May 31, 2012

आयुष्य असचं जगायचं असतं.

May 31, 2012
जे घडेल ते सहन करायचे असतं,
 बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं..

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, 
कुठतरी थांबायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, 
स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं
आयुष्य असचं जगायचं असतं..

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, 
आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी 
मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, 
पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

कसे धन्यवाद देऊ तुला..
आयुष्य असचं जगायचं असतं..

तरी उणं वाटतं.

May 31, 2012
तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं....... तरी उणं वाटतं
सार आहे माझ्याकडे आज  तरी कुठतरी काहीतरी सुनं वाटत

तुझ्या मैत्रीचे क्ष्रण पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझे लख्ख आकाश त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या तुझ्याच मुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्ष्रण हरवू नयेत म्हणून काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीच नात तुझ्या माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून तुझ्या मैत्रीचा वेध घेतात.

तिच्या हातातल्या रेषा शोधतो.

May 31, 2012
तिची आठवण
तिची आठवण आली की  मी समुद्राकडे बघतो अन
पायाला भिजवणार्या प्रत्येक लाटेत ...  तिच अस्तित्व शोधतो !

तिचि आठवण आली की मि आकाशाकडे बघतो
अन ती दिसेल म्हणून उगाचच ... तारे तुटण्याची वाट बघत राहतो !

वाफाळत्या चहात सुध्दा तिचाच गंध असतो
त्या गंधात हरवून  चहा मात्र थंड होवून जातो!

प्रत्येक वेळी आरशात मात्र  फक्त तिच मला दिसते ..
अन तिला निरखून पाहण्यात माझे आवरणे नेहमी राहते!

ति समोर यायची अन  श्वास श्वासात आडकायचा
तिच्या गोड हसण्यात .... जिव माझा कासावीस व्हायचा
मग ...
ति घाबरून माझा हात हाती घ्यायची
तिच्या तप्त स्पर्शात  मि सगळे विसरून जायचो !

आता मात्र तिचि आठवण आली की ...
मि फक्त माझ्याच 
हाताकडे बघतो
अन
हातावरल्या रेघामध्ये
"तिच्या हातातल्या रेषा शोधतो !

इतक्याही जवळ जावू नये.

May 31, 2012
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये  की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी जोडताना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये की पानांना ते नाव जड व्हावे
ऐक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असही बघु नये की आधाराला त्याचे हाथ असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक हातात आपल्या काहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये की कानात त्याचाच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अश्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये त्याचे ' मी पण ' आपण विसरून जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देवून जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे ...... 

आठवणीत जागू दे.

May 31, 2012
कधीतरी तुझ्या डोळ्यांना माझ्या आठवणीत जागू दे...
कधीतरी तुझ्या मनाला त्याच्या मनाने वागू दे...

आनंदाश्रू असताना जे अमृतासारखे वाहतात...
तेच अश्रु दु:खामध्ये विष बनू पाहतात...
 
डोकं एकदा तापलं की तुझासुद्धा राग येतो...
पण या क्षणिक रागामध्ये प्रेमाचाच भाग येतो...

तुझ्यासोबत खेळताना मी हरण्यासाठीच खेळत गेलो...
जिंकण्याकडे दुर्लक्ष करून मी मैत्रीचे नियम पाळत गेलो...

गुलाबाच्या फुलासोबत किमान एकतरी काटा असतो...
'त्या' नाजुक फुलाच्या संरक्षणात त्याचा सिंहाचा वाटा असतो...

तिची फार आठवण येते.

May 31, 2012
पाउस म्हटला की मला तिची फार आठवण येते
तिची आठवण मला लगेच भूतकाळात नेते...

पावसातसुद्धा तिच्या सोबत मी किती किती फिरत असे,
माझ्या वाट्याचा चिम्बपणा सगळा तिच्यामध्ये मुरत असे...

ती भेटल्यापासुन असा एकही पाउस झाला नाही,
की ज्या पावसात तिचा हात माझ्या हाती आला नाही...

घरात एकटी ती नेहमी आक्रसूनच बसायची,
पावसात माझ्यासोबत मात्र अगदी खुललेली असायची...

मला ती आवडण्याचं एक खास कारण होतं,
फुला-फुलांचं वस्त्र तिचं, याचंच मला आकर्षण होतं...

भर पावसात चिखल तुडवित मीच एकटा चालत असे,
चिखालाचा स्पर्श तिला नको, म्हणून अलगद उचलून घेत असे...

तीही माझ्या खांद्यावर आपली नाजुक मान ठेवित असे,
माझ्या डोक्यावर पदर धरून मला पावासापासून लापवित असे...

पण हे सुख माझ्यासाठी फार काळ राहिलं नाही,
आता मात्र दैवाने माझं हीत पाहिलं नाही...

आलेल्या दु:खातून मनाला जरा सुद्धा उसंत नव्हती,
कदाचित आमची मैत्री नियतीलच पसंत नव्हती...

कोणतं दु:ख म्हणून काय विचारताय? माझी व्यथा ऐकायची आहे?
तर ऐका नीट कान देऊन, ही शोकांतिका अशी आहे...

एकदा तिला उचलतांना फुला-फुलांचं वस्त्र फाटलं,
माझं आवडतं वस्त्र फाटलं म्हणून दु:ख मनात दाटल...

दु:ख होऊन नुसतं काय होणार होता रडून,
म्हणून तिच्यावर उरलेलं कापडही मी रागाने टाकलं फाडून...

इतकं सगळं ऐकून तुम्ही योग्यच विचार करताय,
इतक्या खालच्या लेव्हल ला गेलो म्हणून मलाच धारेवर धरताय...

मीही उगाच मघापासून शब्दांच्या शेंगा सोलतोय,
असे काय करता मित्रांनो मी माझ्या छत्रिबद्दल बोलतोय...

Wednesday, May 30, 2012

मी खूपच आश्वस्त आहे.

May 30, 2012
आई -बाबांचे बोट असे धरुन धरुन
चालणार कधी सुटी ही वाटत होते राहून राहून

काय ही शिकणार नीरस शाळेत जाउन
जीवन का उमगेल गणित-शास्त्र वाचून

ऊन्हात पोळणारे पाय जेव्हा दिसतात
जीवनाचा खरा धडा सुरु करुन देतात

दुसर्‍याचे दु:ख जाणता जेव्हा येईल

जीवनाच्या शिक्षणाला खरी सुरवात होईल

दुसर्‍याचे मन जेव्हा ओळखायला शिकशील
जीवनाचे कोडे थोडे उलगडायला लागशील

आता मी खूपच आश्वस्त आहे
जीवन हळूहळू तिच्यात उतरत आहे

मिळत नसेल बक्षीस, नसेल नंबर वर
संवेदनशील मन, उंचावेल जीवनस्तर....

Tuesday, May 29, 2012

तुझा आणि तुझाच होण्याचं.

May 29, 2012
एक स्वप्न .....
अडखळनारी वाट तुझ्यासवे चालण्याचं...
एक स्वप्न .....
पाऊस होऊन तुझ्यावर बरसण्याच
एक स्वप्न .....
वारा होऊन तुझ्या केसात वावरण्याचं
एक स्वप्न .....
तुझ्या गालाच्या खळीत बसण्याच
एक स्वप्न .....
तुला फक्त तुलाच पाहत राहण्याचं

एक स्वप्न .....
फक्त एक स्वप्न ..फक्त तुझा आणि तुझाच होण्याचं.

एक हृद्यस्पर्शी कथा.

May 29, 2012
 "अजय आणि पूजा ह्यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण नंतर अजयला दुसरी मुलगी मिळाल्यामुळे तो पुजाला सोडून गेला, पुजाला फार वाईट वाटले, तिला हे दुख सहन होत नव्हते कारण तिचे प्रेम खरे होते ........ पुढे ४ वर्षांनंतर, अजय आपल्या मित्रांबरोबर माथेरान ला फिरायला गेला, तिथे अचानक अजयला पूजा भेटली, अजयने पुजाकडे तिला सोडून गेल्याबद्दल माफी मागितली, पूजाने मोठ्या मनाने त्याला माफ केले. पुढे ६ दिवस ते एकत्र फिरले, भरपूर मजा केली, पूजा कडे मोठा कॅमेरा होता, त्यांनी खूप सारे फोटो काढले .... तेव्हा, अजय :- पूजा फोटो खूप छान आलेत, सगळे फोटो मला पाठव हं !! पूजा :- २ दिवसांनी माझ्या घरी फोन करून आईकडून फोटो घे, कारण मी बाहेर जाणार आहे. २ दिवसांनतर ..... अजय ( फोनवर ) :- काकू फोटो पाहिजे होते, पूजा म्हणाली तुमच्याकडून घे !! काकू ( पुजाची आई ) :- पूजा ???? अरे पुजाला जाऊन तर ४ वर्ष झाली !!!

खुप दिवसांनी ती दिसली.

May 29, 2012
खुप दिवसांनी ती दिसली.......!

आज............
आज खुप दिवसांनी ती दिसली, तिला बघुन असे वाटले
जसे ती माझ्याशी जन्मभरासाठीच रुसली,

जनु गुलाब या फुलाचे प्रेमीँसाठी महत्वच मेले,
जेव्हा तिने माझ्याकडे बघुन नबघीतल्या सारखे केले,

मित्रानसमोर चेह-यावर खोटे हासु आनुण हसत राहीलो,
ति बघेन या आशेने मागुण तिच्याचकङे बघत राहीलो,

आपल्याच जिवनात का असे प्रसंग घडतात,आपन त्यांचावर कितीही जिऊ ओतला तरी का
अस एकट्याला अर्ध्यावर सोडुन जातात,

मन विचार करत असत उत्तर मात्र का सापडत नाही,
कुठल्याही ख-या प्रेम करणा-याला त्याच मनासारख प्रेम का
मिळत नाही.

सांग ना कधी तरी !!!

May 29, 2012
सांग ना कधी तरी माझीच तू होशील

चार चोघात देखील हात हातात देशील

किती दिवस घाबरत जगणार

किती दिवस चोरून भेटणार

सांग ना कधी तरी माझीच तू होशील

जगासमोर न घाबरता माझे नाव घेशिल

वेगवग ळे बहाने करुन तुझे मला भेटन

जाते जाते म्हणत उगाचच थाबन

काहीतरी बोलून मग लाजण

पाठ करुन माझ्याकडे डोळे झाकून बसन

सांग ना कधी तरी माझीच मला म्हाणशील

चार चोघात देखील हात हातात देशील

एक सत्य.

May 29, 2012
एक सत्य...........
 एका मुलीला आणि मुलाला शेवट पर्यंत फक्त मित्र मैत्रीण बनून राहणे हे जवळपास अशक्य असते .......
.
.
कारण ...........
.
.
दोघांमधील मैत्री टिकवता टिकवता कोणी तरी एकनकळतपणे दुसर्याच्या प्रेमात पडतो आणि अशाप्रकारे आजीवन मैत्री टिकवण्याच्या नादात दोघे प्रियकर प्रेयसी बनतात.

" तू मला सोडून तर जाणार नाहीस ना " ?

खुप प्रेम करतो मी तिच्यावर.

May 29, 2012
खुप प्रेम करतो मी तिच्यावर,  अगदी खरं खरं अन् बेशुमार करतो,
पण
तिने ही करावं प्रेम म्हणून कधी जबरदस्ती नाही केली....
तिने दिला मला नकार, त्याचाही केला मी हसत हसत स्विकार,
मी समजु शकतो शेवटी तिलाही आहेच ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार...  
प्रयत्न करेन मी प्रेमाने तिच्या नकाराला होकारात बदलण्याचा,
प्रामानिकपणे प्रयत्न करेन मी तिचं मन जिंकण्याचा
पण ......का ?
नाही म्हणाली याचा विचार करुन स्वत:लाही मी बदलेन...
ती कितीही नाही म्हणाली तरी तिच्या नकारावरही मनापासुन प्रेम करेन,
नाही... नाही.... नाही... तिचं नाही... नाही... ऐकता ऐकता तिलाही
प्रेम करायला शिकवेन... पण स्वतःच्या हट्टा पाई घेणार नाही तिचा बळी,
काय मिळेल मला तोडून एखादी उमलणारी कळी...
मी मनापासुन खरे प्रेम करतो तिच्यावर, ठेवुन सच्ची निती,
माझे हे सच्चे रुप पाहून बदलेल तिचं मन....
करेलही एक दिवस ती माझ्या प्रेमाचा स्विकार...
कारण फक्त तिला मिळवळं म्हणजे प्रेम नसतो....
खरं तर ... खर्या प्रेमाला कधीच अंत नसतो...

खुप प्रेम करतो मी तिच्यावर,  अगदी खरं खरं अन् बेशुमार करतो,
 

तू बरोबर नसल्यावर.

May 29, 2012
"तू माझ्याबरोबर नसशील तर मी दुरावून जातो
माझ्यामधला मी हिरावून जातो
कुठलेही कार्य करण्याचे उमेद विरून जाते
तू बरोबर नसल्यावर....

तू बरोबर नसल्यावर....
काळाचे भान राहत नाही
वेळचा पत्ता लागत नाही

तू बरोबर नसल्यावर...
हसतानाही मी रडतच असतो
जगण्यात रस वाटत नाही
तू बरोबर नसल्यावर...

पण तू बरोबर असल्यावर
सगळे काही सोपे होते
सगळे दुखः विरून जाते
दिवसाही चंद्रमा भासू लागतो तू बरोबर असल्यावर.......

तुला कळली नाही.

May 29, 2012
गाळले मी तुझ्यासाठी कित्येक आसू
पण माझ्या एकाही आसवाची किंमत
तुला कळली नाही
उतरवले लोकांच्या भावनांना तू शब्दात
पण माझ्या निशब्द प्रेमाची भाषा
तू कधी समजून घेतली नाही
... लोक म्हणतात की, एक जन गेल्याने
दुनिया संम्पत नाही
किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाखो लोग मिळाले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"

तुला काय वाटल.

May 29, 2012
तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस, तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे  नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही, तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत, पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस, तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो, हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस, माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल, एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते, बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले, तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप miss करतो!

Monday, May 28, 2012

का बरं माझ्यासोबत असे घडावे.

May 28, 2012
का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
खरे प्रेम असुनही माझे ते न मिळावे..
कदाचित माझे नशिबचं फुटके असावे,
का बरं मी आता का पुन्हा प्रेमात पडावे..
का कुणी सोडून गेल्याचं दुःख करत बसावे,
का बरं मी पुन्हा खोट्या नात्यात फसावे..
त्याच्या खोट्या रुसण्यावर का मी मनवावे,
का बरं मी कुणासाठी उगाचं झुरावे..
त्याला मिळवण्यासाठी देवाकडे
प्रेमाची भिक का मागावे,
तो नाही मिळाल्यावर त्याची आठवण
काढुन रडत बसावे..
मग त्याला विसरण्यासाठी नको नको फसवे
प्रयत्न करावे,
का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..

काय नसत प्रेमात.

May 28, 2012
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत...♥
उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...♥
लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...♥
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....

तू… साऱ्यात तू.

May 28, 2012
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे… बंध
जुळती हे प्रीतीचे… गोड नाते हे जन्मांतरीचे…
एक मी एक तू… शब्द मी गीत तू… आकाश
तू..आभास तू… साऱ्यात तू… ध्यास मी श्वास
तू… स्पर्श मी मोहर तू…. स्वप्नात तू सत्यात
तू… साऱ्यात तू…
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे… बंध
जुळती हे प्रीतीचे… गोड नाते हे जन्मांतरीचे…
घडले कसे कधी.. कळते न जे कधी.. हळुवार ते आले कसे
ओठावरी.. दे ना तू साथ दे.. हातात हात घे..
नजरेतून नजरेतुनी इकरार घे…
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे..
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे.. बंध
जुळती हे प्रीतीचे…
गोड नाते हे जन्मांतरीचे.

सागरापेक्षा खरचं मला.

May 28, 2012
सागरापेक्षा खरचं मला  क्षितिजच जवळचा वाटतो
मनातलं कागदावर उतरायला असा वेळच कितीसा लागतो.........I

सर्व काही उलगडल तरी काहीतरी राहिलेल असतं
मनातून जे मागितलेलं असतं नेमकं तेच घडत नसतं
आठवणीचा पसारा जेव्हा अखेरचा श्वास गाठतो
मनातल ओठावर यायला असा  वेळच कितीसा लागतो.............I

स्वप्नातली फुलपाखरं जेव्हा डोळ्यातील अश्रुंची जागा घेतात
विचारांच्या पंखावर हळूच स्वार होतात
कहुर्तेच्या क्षणांचा गोडवा जेव्हा मनात साठतो
मनातल डोळ्यात दिसवायास असा वेळच कितीसा लागतो.

तू स्वतः बद्दल.

May 28, 2012
तू स्वतः बद्दल किती सहजच सांगून गेलीस
माझ्या बद्दल मात्र ऐकायचं विसरून गेलीस..
..
हृदय माझं तर घेऊन गेलीसच ..
पण तुझ मात्र द्यायचं विसरून गेलीस..!

स्वप्नातल्या परीला.

May 28, 2012
स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले...
हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले...
पाहून त्या परीला, माझे हे मन फुला सारख फुलले...
अन तिला समोरून जाताना पाहून,
"परत भेटू." अस ते हळूच बोलले...
... "परत भेटू......" अस ते हळूच बोलले.

कुणाला जाणीव ही नसते .

May 28, 2012
कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,
किती त्रास
द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते ...

विश्वास

May 28, 2012
विश्वास बनून माणसे जीवनात येतात,
स्वप्न होऊन मनात घर करून जातात,
सुरुवातीला विश्वास देतात कि ते आमचे
आहेत,
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून
जातात.........

सवय आहे.

May 28, 2012
सवय...आहे... तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसतानाही... सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची... तू ऐकत नसतानाही....
सवय... आहे... तुला पहात बसण्याची..
तू समोर नसतानाही..सवय...आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट
बघण्याची... तो येणार नसतानाही....
सवय...आहे... मन मारून झोपण्याची....
झोप येणार नसतानाही... सवय...आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही.

तु जिंकावं म्हणून.

May 28, 2012
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाहायचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाहायचं होतं
चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नव्हतं
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडी तहि फिरवायचं होतं
सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं
काहीच कसं वाटत नव्हतं....

मी तूझी वाट पाहतोय ................

May 28, 2012
कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहे
श्वासा शिवाय कदाचित
मी काही क्षण जगू शकेन
पण तुझ्याविना नाही

हो तुच पहीली मुलगी आहेस ,
की जिला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल.
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो
हे वेड मन तुझ्यासाठीच
काही ना काही मागण देवाकडे मागत असत

माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय
तडफ़डना-या माशा सरखी झालिय
माहीत आहे तू येणार नाही तरीही....
हे तारे तुटुन जातील ,
हा सुर्य विझुन जाईल

पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय

मी तूझी वाट पाहतोय ................
मी तूझी वाट पाहतोय ................

मागुन प्रेम कधी मिळत नाही.

May 28, 2012
मागुन प्रेम कधी मिळत नाही,
ते समोरच्याच्या मनात असाव लागतं.
 आणि समोरच्याच्या मनात रुजायला,
ते देवाला मान्य असाव लागतं.
 खरे प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही,
ते शेवटी आपल्या नशीबात असावं लागतं.
                     నువ్వొస్తానంటే నేవొద్దంటానా.

शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम ...

May 28, 2012
शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम ...
ते डोळ्यांनी साधायचं असतं ,
आपल कुणी झालं नाही तरी ...
आपण कुणाचंतरी व्हायचं असतं ...
खरचं प्रेमाचा अर्थ इतका व्यापक आहे ?
प्रकाशासाठी स्वतः जळणारा तो दिपक आहे ...
कोवळ्या इंद्रधनूसारखी मनाचा ठाव घेणारी ,
प्रेमाची ही कल्पनाचं किती कल्पक आहे...
अर्थहीन जीवनाला नवा अर्थ म्हणजे प्रेम ,
तहानलेल्या भूमीला पावसाचा स्पर्श म्हणजे प्रेम ...
अमावस्येच्या अंधाराची समिक्षा घेत ,
निखळ चंद्राची प्रतिक्षा म्हणजे प्रेम ...
म्हणूनच ...
जीवनात हवा असतो कुणाचातरी सहवास ,
गर्द माळरानातल्या एकट्या गुलाबाची आस ...
विरहाचे दुःख डोळ्यात लपवूनही ,
भिजलेले डोळे करतात मन उदास ....

जेव्हा तुम्ही प्रेम करता.

May 28, 2012
जेव्हा तुम्ही प्रेम करता, .... तेव्हा तुम्ही दुखावले जाता
जेव्हा तुम्ही दुखावले जाता, .... तेव्हा तुम्ही द्वेष करता
जेव्हा तुम्ही द्वेष करता, .... तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, .... तेव्हा तुम्ही मिस करायला लागता
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, .... तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता,

आयुष्य असतं.

May 28, 2012
किती क्षणाचं आयुष्य असतं
आज असत तर उद्या नसतं
म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं
कारण इथं कुणी कुणाच नसतं
जाणारे दिवस जात असतात
... येणारे दिवस येतच असतात
जाणारांना जपायचं असतं
येणाराँना घडवायचं असत
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं.

तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही.

May 28, 2012

"तुला काय वाटतं... मला त्रास होत नाही... ??
तुला काय वाटतं... मला तुझी आठवण येत नाही... ??

ठीक आहे.. तुझ्या सारखी कविता वगैरे करायला नसेल जमत मला...
पण म्हणून काय तुझी आठवण कमी होत नाही...

... आजपण देवासमोर हाथ जोडून डोळे मिटते तेंव्हा फक्त तुझाच चेहरा समोर येतो... " 'त्याची काळजी घे रे देवा, वेडा आहे तो' असं करत माझ्या प्रार्थनेतला अर्धा हिस्सा आजही तूच नेतो.. !!!!!

एवढंच की मी कधी ते बोलून दाखवलं नाही...
जखम झालीये मलापण पण मी ती अजून कोणाला खोलून दाखवली नाही...

हो रडले मी... एकट्यात खूप रडले.. तू नाही म्हणाला होतास तरी रडले...
पण ते नव्हतं तुला दुखावण्यासाठी.. एक भाबडी आशा होती ती..
की नेहमीसारखा येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी ...
की नेहमीसारखा येशील तू कुठूनतरी माझे अश्रू पुसण्यासाठी.....

आठव जरा ते क्षण.

May 28, 2012
आठव जरा ते क्षण..!!
आज डोळ्यांत पाणी देऊन तू गेलीस
जे कधी स्वप्न मी पाहायचो तू माझ्या मिठीतच रहावीस
आयुष्यभर सोबत राहण्याचे ते स्वप्न आज स्वप्नंच बनून राहिले ..
आठव जरा ते क्षण..!!
तू आणि मी सोबत एकटेच बसायचो तू माझ्या डोळ्यांत आणि मी तुझ्या डोळ्यांत
रहायचो तुझ्या डोळ्यांत पाहताना मी हरवून जायचो तू तशीच डोळ्यांनीच बोलायची
मला म्हणायची तू मला सोडून कधीच जाणार तर नाहीस ना. मी तर वेडाच होतो
मला प्रेम तूच शिकवलेस हसणे काय असता रदन ए काय असता हे तूच जाणवून मज दिलेस
मी हि हसत तुला म्हणायचो वेडे तू तर माझा प्राण आहेस तुला सोडून कसे मी जाणार
आठव जरा ते क्षण..!!
भर पावसात मी तुझी वाट पाहत ओलेचिंब भिजायचो तू येण्याच्या वाटेवर नझर ठेवून
कासावीस मी व्हायचो मग तुझी चाहूल मज व्हायची तू यायचीस मला भेटायला एकच छत्री घेऊन
माझ्या कडे पाहून तू मला रागवायचीस का रे असा भिजतोस मी तर तुझीच आहे ना मग का
 तुला असा दोषी ठरवतोस मला नेहमीच एक भीती वाटायची तू मला सोडून तर जाणार नाहीस ना
मग तू मला घट्ट मिठी मारायची खरचं माझ्या सोन्या तुला कधीच सोडणार नाही ह्याची खात्री मज द्यायची
मग मला हि तेव्हा जिंकल्या सारखेवाटायचे आयुष्यभर हरणारा मी एक विश्वाच मी जिंकायचो
आठव जरा ते क्षण..!!
तू आणि मी भेटायला त्या बागेत बसायचो मी रागावलो तर हातात हाथ माझा घ्यायचीस
बघ ना सोन्या एकदा माझ्या कडे म्हणत मला जवळ तू करायचीस मी हि तेव्हा सगळे विसरून
 तुला मिठीत घ्यायचो,तू मग तेव्हा हसायची.
आठव जरा ते क्षण..!!
तूच सांगायची ना तू मित्रसंगत सोडून दे पण मीच वेडा मला मैत्री खूप आवडायची आयष्यभर
 हरलो मैत्रीत तरी त्यांनाच माझे जिवलग मित्रमी म्हणायचो आज हि वेळ आहे तीच जिथे मी एकटा पडलो
आठव जरा ते क्षण..!!

भेट आता लवकरच घडेल .

May 28, 2012
तुला भेटण्याची ओड  आज  सतवत  आहे 
 दूर जरी असलास तरी तू माझाच सोबत आहे
 तुझापर्यत येण्याची वाट मी हि शोधत आहे
 रस्ता दूर जरी मी तुझापर्यत पोहचणारच आहे

तू हरवलास मला पण मी तुला जिंकणारच आहे
तू गेलास न परतण्याच्या वाटे वरुनी सोडून मला 
मी येऊन तुझ्या  जगात परत तुला मिळविणारच आहे

तू तोडून गेलास प्रेमाच्या  प्रत्येक वचना  जरी   
निभावील मी ती  जीवनाच्या अंत्य श्वासापरी
तो शेवटचा श्वास पण तुझाच नावाचा असेल
तुझी माझी भेट आता लवकरच घडेल!!!!

तुझी माझी भेट आता लवकरच घडेल !!!!

ओळख मात्र दाखव.

May 28, 2012
अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे
पलीकडे एक सुंदर पहाट फुलणार आहे
इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवली आहे
इतके दिवस या आठवणी दडपून टाकल्या होत्या
मग आजच का या पुन्हा आठवू पाहात आहेत?
उद्या काहीतरी घडणार आहे का?
माझ्या प्रिय व्यक्तीला काही होणार तर नसेल ना?
देवा, तिला नेहमी आनंदात ठेव
काढत नसेल माझी आठवण तरी सुखात ठेव
माझ्या आठवांच्या लहरी तिच्यापर्यंत पोहोचू नको देऊस
मन माझे रडले तरी तिला ऐकू नको येऊ देऊस
विसरून गेली मला तरी सुद्धा चालेल
पण भेट जर कधी झाली तर ओळख मात्र दाखव.

का ग सखे रुसलीस

May 28, 2012
का ग सखे रुसलीस... का ग सखे रुसलीस..
अशी एकटी का बसलीस..  कालच तर तू हसलीस..
अन माझ्या प्रेमात फसलीस.. एव्हड काय माझ चुकलं..
ज्यान हृदय तुझ दुखलं..अग काहीतरी बोल..
आणि ओठ तुझे खोल..अग सोड न तुझा राग..
अन काय पाहिजे ते माग...चंद्र मागशील तर चंद्र देयील..
सूर्य मागशील तर सूर्य देयील..वाटलाच तर सागरात उडी पण घेयील..
पण का ग अशी रुसलीस..अन अशी एकटी का बसलीस..
अस नकोना ग तू रडू..मला वाटतंय खूपच कडू..
तू जर नाही बोलणार..तर मी पण नाही जेवणार..
तू जर नाही बघणार..तर मी पण नाही जगणार..
अग थोडी तर कर माझी कीव.इथे जातोय माझा जीव..
सांग न ग.. का तू अशी रुसलीस.. अन अशी एकटी का बसलीस..
कालच तर तू हसलीस.. अन माझ्या प्रेमात फसलीस..
आता सोडून जाईल मी हे जग.. अन बस तू रडत मग..
नाहीतर दुसरा प्रियकर शोध.अन शांत कर तुझा क्रोध.
काय बी असो माझा गुन्हा..आता करणार नाही मी पुन्हा..
आता एकदा तरी गोड हास.आणि पूर्ण कर माझी आस...
का ग सखे रुसलीस..अशी एकटी का बसलीस..
कालच तर तू हसलीस अन माझ्या प्रेमात फसलीस...

माझ्या मना.

May 28, 2012
माझ्या मना
माझ्या मना तू माझ्या मना मला तू तरी समजून घे ना
उगा नको तू प्रश्न विचारूउत्तर मला माहीत नसेल ना
न ऐकले तुझे अन भेटलो तिलाका भेटलो तेव्हा ते मला कळेना
दुर ती गेली निघूनी सोडून मला  आठवण तिची कधी काढू नको ना
होती का काही तिची मजबूरी?ती तरी का सांगेल कोणा?
असेल का रे स्थिती तिची अशीच माहीती का तुला? तू मला सांग ना!

कोणाची तरी राखण आहे.

May 28, 2012
आवरलेल्या मनातुन
सावरलेले क्शण आहेत
तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले
काही गुलाबी पण आहेत
तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय
आता मला करुन घ्यायला हवी
कारण  रात्रींमध्ये तुझ्याच
आठवणींची स्पंदनं आहेत
फक्त मला.........
भिती वाटत राहते संध्याकाळ्ची
कारण या कातर वेळी तुझ्यावर
दुसर्याच कोणाची तरी राखण आहे.

तुझ्याशी बोलताना.

May 28, 2012
 तुझ्याशी बोलताना, मी तुझ्या डोळ्यात पाहतो, फक्त मीच त्या पाण्यात नाहतो.  जेव्हा पापणी लवते, त्याच पाणी रूपात तुझ्या ओठी येतो, हळूच ओठ पाणीदार होतात, मग त्याच ओठांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी तू मला अडवतेस, अडवताना लाजतेस, थोडी दूर जातेस, पण नंतर हातात हात धरतेस, मग हीच लाज माझी धिटाई बनते. जेव्हा मी घरी जाण्यास निघतो, तेव्हा तुझ्या चेहरयावरचे हास्याच गमावते, मग ते परत आणण्यासाठी तुला भेटण्याचे वचन देतो, आणि त्या क्षणाची आठवण घेऊन अश्रू सावरतो.

हवी तुझी साथ मला.

May 28, 2012
हवी तुझी साथ मला चान्दणराती जागताना
पिठुर शुभ्र चान्दण्या मनसोक्त फिरताना

हवी तुझी साथ मला धुवाधार पाउस बरसताना
अन्गणात पडलेल्या गारा ओन्जळीत वेचून घेताना

हवी तुझी साथ मला शब्द शब्द बान्धताना
अक्षरान्ची गुम्फुन माला सुरेल गीत छेडताना

हवी तुझी साथ मला जीवनगाणी गाताना
एकेक पदर आयुष्याचा हलकेच पलटून टाकताना.

रोज स्वःताला.

May 28, 2012
रोज तुला विसरतो, रोज तुला आठवतो..
रोज काहीतरी ठरवतो, रोज काहीतरी मिटवतो..
रोज स्वःताला सोपवतो, रोज स्वःताला परत मागतो..
रोज तुझी अपेक्षा करतो, रोज स्वःताची उपेक्षा करतो..
रोज रात्री जागवतो, रोज पहाट लांबवतो..
रोज स्वःताला थांबवतो, रोज स्वःताला सोडवतो..
रोज शहानपण दाखवतो, रोज वेड्या सारखा वागतो,
रोज बावरतो, रोज़ सावरतो..
रोज तुझ्यातचं हरवतो, रोज तुझ्यातचं सापडतो..
रोज स्वःताला संपवतो,रोज स्वःताला जगवतो..

माझा हृदयाला खात्री आहे.

May 28, 2012
कुठे ना कुठे तरी तू मला भेटशील याची मला खात्री आहे
तूच माझ जीवन झाल आहे
तुझाविना जगू शकत नाही एकही क्षण
होईल तेथे अंधारामध्ये उजेड
होईल तेथे हि आपल्या दोघांचे मिलन
आहे हि वाट कुठ पर्यंत आहे तुझी कुठे ती पायाची निशाणी जगायचं आहे मारायचं आहे
अस काही तरी करायच आहे
जिवंत राहूदे आपल्या प्रेमाची कहाणी
नको मीठउ ती प्रेमाची निशाणी 'तुझ जीवन' हेच माझ
जीवन झाल आहे
हृदयात झाली आहे आठवणीची तुझ्या खळबळ भिजले आता अंग आणि भिजले आठवणींनी तुझ्या डोळे
न जाणो कोणत्या पापाची देते आहेस मला तू शिक्षा
जे पाप केलच नाही
सगळेच दुख माझे खोलवर गेलेत जाऊन ते कुठे ती थांबले आहेत
थांबेल माझ्या हे दुखाचे वादळ
कुठे ना कुठे तरी भेटशील याची माझा हृदयाला खात्री आहे.

मी नाही म्हणत.

May 28, 2012
मी नाही म्हणत.... तू फक्त माझं असावं... पण माझ्या जीवनात मात्र तुझ्याखेरीज कुणी नसावं... 
मी नाही म्हणत.... तू मलाच आठवावं..पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात राहावं..
 मी नाही म्हणत.... तू मला मनात ठेवावं... पण माझ्या मनी मात्र तूच वसावं... 
मी नाही म्हणत.... तू माझ्यासाठी रडावं....पण माझी पापणी मात्र तुझ्याचसाठी भिजावं.. 
मी नाही म्हणत.... तू मला प्रेम कराव... पण कधीतरी तुलाही माझ्याचसारखा प्रेम व्हाव... 
मी नाही म्हणत.... तू कधी हसू नये.... पण माझ्यासाठी हसण्याचे कारण मात्र तूच असावं.. 
मी नाही म्हणत.... तू मला भेटावं..पण माझ्यासाठी ती भेट मला सुखी करून जावं... 
मी नाही म्हणत.... कधी तू माझ्यासाठी कविता रचावी... पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी.... 
मी नाही म्हणत.... कधी तुला मीच दिसावं.... पण मला, डोळे बंद होताच स्मरणात तुझाच चित्र रेखातावं... 
मी नाही म्हणत.... कधी तुझी भावना तुझ्यापासन दूर जावी.. पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली.... 
मी नाही म्हणत.... तुझ जगन माझ्यासाठी बदलावं... पण माझं स्वप्न जगणं हे तुझ्याकुशीत पूर्ण व्हाव... 
मी नाही म्हणत.... माझ्या भावनानसोबत खेळू नको... पण माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस... मी एवढच म्हणते.... माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी.... अन पुढच्या जन्मीतरी तु माझा अन मी तुझी बनून याव...

हे खरोखर प्रेम आहे .

May 28, 2012
तिचं - माझं अचानक भेटणं की एकमेकांच्या नजरेत हरवून जाणं ...
तिचं हळूवार लाजणं की माझं गडबडून जाण..
माझं शांत गाणं, की तिचं शब्द जोडणं..
माझं छान दिसणं, की तिचं आकर्षक असणं..
माझं चंचल मन, की तिचं संथ हृदय..
माझं हलकेच हसणं, की तिचं माझ्यात गुंतण..
माझं स्पर्श करणं, की तिचं मोहरून जाणं..
दूर असताना मला तिची आठवण येणं,
की माझं नेहमीच तिच्या सोबत असणं..
माझं तिला चिडवणं, की तिचं उगाच रागवणं..
मी दुसरीला बघितल्यावर तिचं जळणं,
की तिचं दुस-याशी बोलणंही मला सहन न होणं..
भेटल्यावर तिला वेळेचं भान नसणं,
की तिला लवकर घरी जाण्याची ओढ लागणं..
भांडण झाल्यावर माझं उदास होणं,
की तिचं सतत बेचैन असणं..
ती अन् मी कधी मित्र - मैत्रिण असणं,
की कधी त्याहून जास्त काहीतरी वाटणं..
हे खरोखर प्रेम आहे ?
की मैत्री ? की फक्त आकर्षण ?


तू सांग ना ग.

Sunday, May 27, 2012

युगानुयूगे जगणे.

May 27, 2012
रस्त्यावरच्या वळणावर तुज़े मागे वळून पहाणे ,
अन त्याच एका क्षणासाठी माज़े दिवसभर वाट पहाणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला ... कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते माज़े युगानुयूगे जगणे .

पावसात एकटा भिजताना अचानक तुज़े दिसणे ,
अन तुज़या च्तरित चलताना ते निम्मे निम्मे भीजणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला कुणी नुसतेच भीजणे ,
पण त्याच एका क्षणात होते माज़े युगानुयूगे जगणे .

बोलता बोलता तुज़े माधेच गप्प राहणे ,
अन तुज़या बोलक्या डोळ्याणकडे फक्त पाहत राहणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते माज़े युगानुयूगे जगणे .

तुला एक नजर पाहण्यासाठी गर्दीत शोधत राहणे ,
अन तू समोर नसताना तुला डोळे मिटून पहाणे,
कुणी म्हणेल प्रेम याला कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते माज़े युगानुयूगे जगणे....

असं प्रेम करावं

May 27, 2012
असं प्रेम करावं थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं... गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन"अगं"चा"अरे"करावं
असं प्रेम करावं जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं, असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं, असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं, पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील, पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ...
असं प्रेम करावं..

यू आर इन लव्ह.

May 27, 2012
तुम्ही कुणा खास व्यक्तीबरोबर असता , तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवत .
पण ती व्यक्ती जवळपास नसते, ... तेव्हा तुमची नजर त्याला शोधत असते.
हं ... तुम्ही प्रेमात पडलाय हे नक्की

तुम्हाला हसवणारं कोणीतरी तिथे असतं, तरी तुमचं लक्ष मात्र दुसर्‍याच खास व्यक्तीकडे असतं .
तुम्ही नकीच प्रेमात पडलायत.

खरं तर त्याने खुप आधीच तुम्हाला त्याच्या येण्याची वर्दी द्यायला हवी होती ,
पण तुमचा फोन काही वाजत नाही. तुम्ही मात्र त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघत असता.
नक्कीच तुम्ही प्रेमात पडलाय ....

तुमच्या मेलबॉक्समध्ये त्याचे भरपुर मेल / मॅसेजेस आलेले असतात ,
पण मेलबॉक्सची कॅपॅसिटी संपली तरी तुम्हाला ते इरेज करावेसे वाटत नाहीत.
तेव्हा तुम्ही नक्कीच प्रेमात असता .

' तो फक्त माझा चांगला मित्र आहे ' तुम्ही स्वतःलाच बजावत असता ,
तरीही त्याचे विचार टाळता येत नाहीत. म्हणजे तुम्ही नक्कीच प्रेमात असता.

आता हे वाचतानाही जर कोणी तुमच्या मनात डोकावत असेल ...
तर .....................तर यू आर इन लव्ह !!!!

सांगू शकत नाही.

May 27, 2012
"सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर शब्द-शब्द
वेचून केली जरी कविता तिला ही येणार तुझी सर .....
सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर एक-एक
 पुस्तक लिहायला गेलो त्यावर पाने ही अपुरी पडतील त्यासमोर ......
सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर करता-करता
 तुझ्या सौंदर्याची तारीफ दिवस काय रात्रीचाही मला पडतो विसर.......
... सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर सकाळी-सकाळी
घराबाहेर पडताना दर्शन तुझ घेण्यासाठी होतो मी आतुर .....
सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर कधी-कधी
मलाच अस वाटत माझी लागेल तूला नजर ....!!!

मी पण प्रेमात पडलो होतो.

May 27, 2012
पाहताच क्षणी फ़क्त तू नाही, मी पण प्रेमात पडलो होतो,
मनाची चल-बिचल फ़क्त तू नाही मी ही अनुभवत होतो,
मग तुला का वाटले  मी  प्रेमात  नव्हतो …?

चोरून पाहण्याचा खेल फ़क्त तू नाही, मी पण उघडपणे खेलत होतो,
डोळ्यातले तुजे सुवाद फ़क्त तू नाही, मी पण अप्रत्यक्ष रित्या बोलून साधत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

समोर असण्याची इछा फ़क्त तू नाही, मी पण देवाकडे मागत होतो,
मधे येणारा दुरावा फ़क्त तू नाही, मी पण संधि साधून टालत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

पहिल्या प्रेमात फ़क्त तू नाही, मी पण विचारायला घाबरत होतो,
मनातली भावनेत फ़क्त तू नाही, मी पण पुरता गुंतत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

उगाच रुसलेले फ़क्त तू नाही, मी पण खोटे खोटे दाखवत होतो,
दुराव्याच कडू कारल फ़क्त तू नाही, मी पण कधी कधी मुद्दाम खात होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

प्रेमाची परिभाषा फ़क्त तू नाही मी पण प्रथमच शिकत होतो,
सावधपणे पाउल फ़क्त तू नाही मी पण मित्राना विचारून टाकत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

प्रेमाची काबुली फ़क्त तू नाही मी पण देणार होतो,
पुढाकार घेणारा कोण हे फ़क्त तू नाही मी पण मनाला विचारत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

बोलायची गरज नाही हे फ़क्त तू नाही असे मी पण समजत होतो,
दोघांचे प्रेम आहे हे फ़क्त तू नाही मी पण मनापासून मानत होतो,
मग तुला का वाटले मी प्रेमात नव्हतो …?

मन माझे तुझ्याकडे आहे.

May 27, 2012
मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे, तुझेही माझ्यात गुंतवून बघ.

प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.

क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा, मनात माझ्या बुडून बघ.

स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.

जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ मी
तर वेडी झालीच आहे तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.

जसा तू सामावलायस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा अन् मी वेगळी एकरूपता तरी जाणवेल बघ.

नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी तुझ्या मला असू दे बस्स !!

वाटल नव्हत.

May 27, 2012
वाटल नव्हत ह्रदय तुटल तर इतक दुःख  सोसाव लागेल,
आज पर्यंत स्वासानी मला, पण  यापुढे त्याना पोसाव लागेल,

तुझ्या आठ्वानिच्या साखर  झोपेत, माझी कालची रात्र गोडव्यात सरली,
पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायच, पण  काल स्व्प्नानिच मनात जात्रा भरली,

प्रेम…. शब्द  दोन  अक्षरांचा, नुसता  एकला  तरी  हर्ष  होतो,
आणि  उच्चारला  तर दोन  ओठांचा  स्पर्श  होतो,

तुज्या  डोळ्यातला इवलासा  अश्रु, मला  समुद्राहून  खोल  वाटला,
कारन  मीच  होतो, म्हणून  माझ्या  डोळ्यात  समुद्र  दाटला,

माझे दुःख बघवत नाही, म्हणून एक ढग रदत होता,
तुमच आपल काही तरीच, म्हणे तेव्हा पाउस पडत होता..

ओळख.

May 27, 2012
ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची

ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी

ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात

मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो

कशाला करावी पर्वा कोणी कोणाची जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी

मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना

ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची ......

तू अशीच आहेस.

May 27, 2012
तू अशीच आहेस, एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील, स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....

तू अशीच आहेस, खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे , कुणालाही सहज आपलसं करणारी .....

तू अशीच आहेस , जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही, आपला धर्म माननारी....

तू अशीच आहेस, एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील, स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....

तू अशीच आहेस, खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे , कुणालाही सहज आपलसं करणारी .....

तू अशीच आहेस , जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही, आपला धर्म माननारी....

तू अशीच आहेस, दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता नियतीला लाजवनारी ...

तू अशीच आहेस, इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र, काळोखात आटनारी ......

तू अशीच आहेस, सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात घर एक करुन रहणारी ........

दुखाःतही नेहमी हासनारी.... अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...  तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी .... पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी ......

तू अशीच आहेस, सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात घर एक करुन रहणारी

लग्नाची पञिका

May 27, 2012
तिच्या लग्नाची पञिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची 'आसवे' पुसली....
एक 'अश्रु' नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव खराब होईल म्हणुन पुसनारा हाथ अडला...
दोन_चार थेँबं तिच्या 'आईच्या' नावावरही पडली होती,
जिच्याकडे हाथ पसरवून ती माझ्यासाठी रडली होती.
काही घसरलेली आसवे 'लग्नस्थळ' दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची 'भेटायची जागा' होती....
'आहेर आणु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या 'बर्थ_डे' साठी मी माझा मोबाईल विकला होता...!

एक मुलगी.

May 27, 2012
एक मुलगी...
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..
ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

प्रेम करून बघ.

May 27, 2012
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ.. खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ.. कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ.. खुप छान वाटत रे..

सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ… नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ.. नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ.. एक जखम स्वतः करून बघ..

स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ.. नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ.. विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ.. रिकाम काय चालायच..?

आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ.. रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ.. सोपं नसत रे…एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ.. सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ......

आपुली घडली होती.

May 27, 2012
दूर दूर त्या वळनावरती, भेट आपुली घडली होती..
बघता बघता दोघांचीही, ह्रदय जणू धडधडली होती..

ह्रदय अशी धडधडली जेव्हा, डोळ्यांचे जाहले इशारे..
तुझी पापनी अलगद उठता, तीर मनाला भिडले सारे..

तीर मनाला भिडतान्नाही, गंध तयाचा दरवळला..
हलके हलके श्वासही माझा, गंधासोबत विरघळला..

विरघळताना श्वास म्हणाला, सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या, मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा, धरणीला या सूर मिळे..
भेट आपुली पाहून राणी, मंद मंद पाउस जळे..

मंद मंद पाउस जळे हा, झुरू लागली ही धरती..
प्रीतिचा गुलमोहर फुलला, दूर दूर...त्या वळनावरती..

मन हे असे का असते.

May 27, 2012
मन हे असे का असते असूनही स्वतःचे दुसर्‍याचे का भासते

असूनही सर्वांमध्ये एकाकी त्याचाच विचार करणारे,
दिसणार्‍या प्रत्येक चेहर्‍यात त्याचाच चेहरा पाहणारे,
नसता जवळी तो उगीच वेड लावते
मन हे असे का असते ????

नाही येणार तो माहीत असूनही तासन तास सैरभैर वाट पाहणारे,
आजतरी माझ्यासाठी त्याला वेळ मिळू दे
म्हणून देवाला प्रार्थना करणारे, खोटी आस लावून स्वतःच स्वतःला फसवते
मन हे असे का असते ????

किती वेळा समझावे ह्याला नाही इथे कुणी कोणासाठी,
नाही आहे वेळ इथे कुणाला क्षणभरही तुझा विचार करण्यासाठी,
जाणते हे सर्व तरी त्याच्यासाठीच झुरते
मन हे असे का असते ????

तिची आठवण आली.....

May 27, 2012


नकळत तिची आठवण आली.....

असाच एकदा एकांतात बसलो असताना........ नकळत तिची आठवण आली,

अन् डोळयांसमोर जणू तिची प्रतिमाच तयार झाली.....तिला पाहून......
मनाला खुप काही बोलायचे होते, पण ओठातुन शब्द निघत नव्हते......
डोळयांतही पाणी जमा झाले होते, पण अश्रु गळत नव्हते.....
श्वासही अजुन चालू होता, पण हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते......
बरेच काही विपरीत घडत होते, पण मनाला काही कळत नव्हते.......
अचानक डोळयांवर सुर्याचे किरण आले, अन् तिच्या प्रतिमेचे जणू दहनच झाले.......
क्षणभर काही कळलेच नाही, मनाला मात्र वळलेच नाही.....
काही कळायच्या आधीच...... "ओठातुन तिचे नाव निघू लागले......
डोळयांतुन अश्रु गळू लागले..... अन् हृदयाचे ठोकेही वाढू लागले...... "
पण......
नकळत तिची आठवण आली..... नकळत तिची आठवण आली...

Saturday, May 26, 2012

बघ तारा तुटताना दिसेल.

May 26, 2012
बघ तारा तुटताना दिसेल

कधीतरी तुझी मुकी होइल वाणी आठवतील तुलाही आपली सोबत गायलेली गाणी
दाटून येइल सखे तुझाही कंठ ना दवा कामा ना मिळेल तुला सुंठ
शब्द होतील मुके मुके अन डोळ्यात दाटेल पहटाचे धुके
हात जाईल पदराला पुन्हा पुन्हा सांगशील का गेलीस सोडून एकट्याला
झाला काय गुन्हा ? थांब तेंव्हा रडू नको अश्रुना गाळु नको
एकटी राहू नको जरा गच्ची वर जा
आभाळ बघ चांदण्या मोज आठवत तुला त्या आपल्या नक्षत्रा पासून
उजवी कड़े तुझ अन डावी कड़े माझे ...आपण वाटुन घेतलेल आभाळ
रोज रात्री आपण मोजयचो त्या ता-यांना.. आजही पुन्हा मोज
बघ तुझ्या आजही तितक्याच भरतील माझ्या मात्र एक एक करून गळुन चालल्यात
तुझ्या सा-या विश पूर्ण होण्यासाठी ... आता हस पुन्हा एक विश कर ...

बघ तारा तुटताना दिसेल ...

तिचि आठवण् आल्यावर्.

May 26, 2012

तिचि आठवण् आल्यावर्....
तिचि आठवण आली कि मि आकाशाकडे बघतो
अन् ति दिसेल म्हणुन् उगाचच्.. तारे तुटन्यचि वाट् बघत् राहतो!   
वाफ़ळत्या चहात् सुध्दा तिचाच् गन्ध् असतो..
त्या गन्धात् हरवुन्.. चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!
प्रत्येक् वेळि आरशात् मात्र फ़क्त् तिच् मला दिसते..
अन् तिल निरखुन् पहान्यात माझे आवरणे नेहमि रहाते!
ति समोर यायचि अन् श्वास् श्वासत् अडकायचा
तिच्या गोड हसन्यात्... जिव माझा कासाविस व्हायचा
मग्..
ति घाबरुन् माझा हात हाति घ्यायचि तिच्या तप्त स्पर्शात्
मि सगळे विसरुन् जायचो!
आता मात्र तिचि आठवण आलि कि.. मि फ़क्त् माझ्याच् हाथाकडे बघतो
अन्
हातावरल्या रेघामध्ये तिच्या हातातल्या रेषा शोधतो!
तिचि आठवण् आल्यावर्....

प्रेम करतेस खरोखर.

May 26, 2012
प्रेम करतेस खरोखर !

प्रेम करतेस खरोखर ! होशील जन्माची जोडीदार,
तर आताच विचार कर..
मी चालेन सरळ मार्गावर, तुला ठेच लागलीच तर,
फोडू नकोस खापर माझ्यावर..
जीवनातील आगंतुक अपयशाचे, करणार असशील गैरसमज तर,
आताच पक्का निश्चय कर...
देतो तुज मी आश्वासन, करीन अर्पण अंतःकरण
फुलासम जपेन तव मन...
आश्वस्त हो, निर्धास्त हो फुलविन,फक्त सुगंध देईन,
तुझं सारं दुःख मी वाहीन...
प्रेम करतेस माझ्यावर ! फक्त सुखद झुळूक येऊ देईन,
उष्मा सारा मी गिळून घेईन...

शेवटी त्या फ़क्त कविता.

May 26, 2012
शेवटी त्या फ़क्त कविता...

राम आणि श्याम-राधा महाभारत आणि गीता
सारी पात्रच काल्पनिक शेवटी त्या फ़क्त कविता...

देवतांची युध्द सारे न्याय म्हणुनी सर्व मान्य
छेडतो कुणी गोपिकांना "रास" म्हणुनी सर्व मान्य
न्याय देतो कवीच सारे कल्पनांचा रास होता..
सारी पात्रच काल्पनिक ....

कर्म जेही देव करितो आज ते का मान्य नाही
पळविली स्त्री मंदिरातून मज मतिने स्तुत्य नाही
कृष्णकार्य कृष्ण करितो, तरीही तो का स्तुत्य होता?
सारी पात्रच काल्पनिक ....

नाव दिधले वेद काही मंत्र काही श्लोक काही
वाचण्या त्या फलश्रुतिही सुख काही शोक काही
यात कसले सुख सांगा? हाच मज तर शोक होता
सारी पात्रच काल्पनिक ....

शब्द माझे रोष भरले  मतीने मूढ़ आहे
गुन्हे सारे माझे नाही ही रहस्य गूढ़ आहे
वा कदाचित या कवींना रहस्यांचा शोध होता..
सारी पात्रच काल्पनिक

शेवटी त्या फ़क्त कविता...

प्रेम वीचार ..

May 26, 2012
प्रेम वीचार .

एकदा मला भेटायला माझ्या घरी येशील
आणि केस मोकळे सोडून माझ्या जवळ बसशील

मी दोन्ही हातांमधे तुझा चेहरा घेईन
रेखीव गहिऱ्या डोळ्यांमधे बघून हरवून जाईन

तू विचार माझा राज़ा असं काय बघतो?
मी म्हणेन बघतो कुठे? पावसात भिजतो

मग तू अलगद, तुझा रेखीव पापण्या मिटून घेशील
पाऊस ओसरल्यावरचं निरभ्र आकाश होशील

मग विचार किती वाजले? वेळ झाली का?
मी म्हणेन हे ग काय राणी मग तू आलीसच का?

मला जवळ घेऊन माझी समजून घाल
म्हण राजा सोडून जाताना माझेही होतात हाल

मग मी तुला पुन्हा एकदा डोळ्यात साठवून घेईन
आणि एकदम शहाण्यासारखा तुला जाऊ देईन...

तु फ़क्त हो म्हण.

May 26, 2012
तु फ़क्त हो म्हण

तुझ्यासाठी माझ्यात बदल करुन घेइन मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन मी
तुलाच सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी तु फ़क्त हो म्हण
जीवनाच सोन करेन मी सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी तु फ़क्त हो म्हण
तु फ़क्त हो म्हण
या जगाला सुद्धा जिन्कून दाख्वेन मी प्रेम काय असत हे दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण
माझ्याबरोबर सदा रहा अशीच साथ आयुष्यभर देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा तु फ़क्त हो म्हण

तु फ़क्त हो म्हण....

हे शब्द ठरवतात.

May 26, 2012
हे शब्द ठरवतात ....

आजही तोलले जातात शब्द भावानाच्या तराजुत
कोणता पगडा भारी ? हे शब्दच ठरवतात

आजही अवतरले कितीही तेहि मोलाच्या भावात गेले
शेवटी कोण उरले ? हे शब्द ठरवतात

वासराचे माये विषयी प्रेम मायेचे वात्स्ल्याची माया
अंती प्रेम भले हे शब्द ठरवतात

देवा मला पावरे तुझा पत्ता मला ठाव रे
तरीही जन्म्जन्म घेणे भाग पादने

हे शब्द ठरवतात.....

कधी असे ही जगुन बघा........

May 26, 2012

माणूस म्हणुन जगताना हा हिशोंब करुन तर बघा
"किती जगलो ?" याऐवजी " कसे जगलो"? जा एक प्रश्न जरा मनाला विच्रून तर बघा
कधी असे ही जगुन बघा....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा
तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसून बघा
कधी तरी असे ही हसून बघा....

संकटामुले खचून जाणारे शेकडोनी मिळतात कधीतरी अड़चनीवर मात करण्याची हिम्मत करुन तर बघा
स्वतापुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काडीचा आधार होवून तर बघा
कधी तरी असे ही जगुन बघा....

वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचिच असते कधीतरी भुतकालच्या विश्वात रंगून तर बघा
कालाची वालू हातातून निसटली म्हणुन काय झाले? आधी अनुभवलेला क्षण पुन्हा जगुन तर बघा
कधी तरी असे ही जगुन बघा....

प्रतिसादाची कालजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मल,एकतर्फी "प्रेम" करुन तर बघा........

कुणीतरी असाव

May 26, 2012
कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव, आपल वाटणार,
कुणीतरी असाव, आठवण काढणार !

कुणीतरी असाव, स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव, आसव टीपणार !

कुणीतरी असाव, गाली हसणार !
कुणीतरी असाव लाजवणार !

कुणीतरी असाव, मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव, चांदण्यांचा वर्षाव करणार !

खरच कुणीतरी असाव, क्षितिजापार घेवून जाणार !!

जीवनाचे कोडे.

May 26, 2012
जन्माला आला आहेस थोड जगुन बघ..!
जीवनात दुःख खुप आहे थोड सोसून बघ..!
चिमुटभर दुखानी कोसुनं जाऊ नकोस ..!
दूखाचे पहाड़ चडून बघ ..!
यशाची चव चाखून बघ ..!
अपयश येते निरखून बघ ..!
दाव मंडन सोपे असत जीवनाचे घोडे खेचून बघ ..!
घरटे बंधने सोपे असते थोडी मेहनत करून बघ ..!
जगन कठिन असत मरण सोपे असत डोन्हितल्य वेदना
ज़ेलून बघ ..!
जीने मरने एक कोड असते जाता जाता एवढ.

असं फक्त प्रेम असंत.

May 26, 2012
असं फक्त प्रेम असंत

असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं
प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं
... असं फक्त प्रेमच असतं

मधुबन .

May 26, 2012
मधुबन ..........
आभाळ होउन बरसला, त्याने वर्षाव प्रेमाचा केला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!

अपूर्व सुख लाभले, चांदण्यात घेउन गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!

स्पर्शात हरवले मी, बेधुंद करुनी गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!

नजरेनेच आज तो, स्पर्शुन देह गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!

फूल आज जाहले मी, भ्रमर तो ही झाला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!

सहवास आज त्याचा, मज उमलवून गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!

तू आहेस तरी कुठे .

May 26, 2012
स्पर्श ............ स्वप्नांचा!!
रोजच्या हवेत गारवा असतो तुझ्या स्पर्शाचा,
हवेतील गारवा तुझाच की तो स्पर्श माझ्या स्वप्नांचा?
न जाणो के समजू या सम्भ्रमावस्थेला!
दूर क्षितिजावर तारा लुकलुकतो,
मला वाटत तूच तो, जो माझ्याकडे पाहून हसतो!
वेलीवर गोंडस फूल फुलत, त्यातही मला तुझ प्रतिबिम्ब दिसत!
वेगाने दौडतोय वारू मनाचा, न जाणो के समजू या सम्भ्रमावस्थेला!
तू खरच आहेस की ....... कल्पनाच ती माझी?
पण नाही तू आहेसच...... कारण, मला जाणवलायस तू,
माझ्या आजुबाजुला, मी बोललेय तुझ्याशी,
मी हसले तुझ्या बरोबर, मी रागावलेय तुझ्यावर,
मी रडलेय रे तुझ्या खांद्यावर, मग तू आहेस तरी कुठे?

सांग तू आहेस तरी कुठे ....... कारण,
आजही रोजच्या हवेत गारवा असतो फक्त तुझ्याच स्पर्शाचा!!

लग्न एक कैफियत..............

May 26, 2012
आयुष्यात चालताना माणसाला साथ हवी असते
म्हणुन तो लग्न करतो लग्न कसले एकप्रकारे विघ्नच करतो

नाही संसाराची जाण नाही सारं सांभाळण्याचं भान
गळ्यात पडले म्हणुन रेटत असतो संसाराचा गाडा चालवत असतो

लग्न म्हणजे काय ? याचं कुणाला आहे काय
लोक करतात म्हणुन आपणही करावं असं नाही तर तसं रडून पहावं

भांडी-कूंडी, मूलं-बालं याला तो संसार समजतो यातच सारं जीवन मौजमजेत घालवतो

लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला की समुद्राच्या वालुचा संसार वाटला
आलं मनात तर मोडून दिला नाहीतर भातुकली समजुन सोडून दिला

संसार म्हणजे काय ? लग्न म्हणजे काय? हे समजावून दाखवायची आली आहे वेळ
दोन जीवांचा खेळ करून मिलनाचा मेळ विश्वास आणि प्रेम याची करावी गोड घालमेल .

तुला याचे काही नाही .

May 26, 2012
तुला याचे काही नाही ..!!

कोणी जगाने नाही कोणी मरने नाही
मला हे खरे वाटते याचे तुला काही नाही ...!!

कोणी हसने नाही कोणी रुसने नाही
मला ही तर गम्मत वाटते तुला याचे काही नाही ...!!

कोणी सत्य नाही कोणी खोटे नाही
याचा परिणाम कसा होतो तुला याचे काही नाही ..!!

कोणी फुल्पुष्प नाही कोणी दगड-धोंडा नाही
यांनी कसे वावरावे तुला याचे काही नाही ..!!

कोणी भावना नाही कोणी पाव्हणा नाही
यात कसला मतभेद आहे तुला याचे काही नाही ...!!

कोणी पास नाही कोणी आसमांत नाही
सारे काही आपलेच आहे तुला याचे काही नाही ..!!

कोणी दया नाही कोणी धर्म नाही
सारी मानसं एकच आहेत तुला याचे काही नाही ....!!

कोणी विष नाही कोणी अमृत नाही
सारी सरणावर येतच राहतात तुला याचे काही नाही ..!!

कोणी भुत नाही कोणी भविष्य नाही
वर्तमानात जगनेच अवघड तुला याचे काही नाही ....!!

कुणीतरी.

May 26, 2012
अस कुणीतरी जिवनात याव् " तु माझा ,तु माझा ,"म्हणत्
प्रेमाने जवळ घ्याव्, फक्त तिअच्य स्पर्शाने अंगावर रोमांच याव्,
अस कुणीतरी जिवनात याव् सुखाच्या क्षणात्
मनापासुन हसवाव्, दु:खात माझ्या सहभागी व्हाव्,
अस कुणीतरी जिवनात याव् ऊनात चालताना
साथ दयावी, पावसात त्याची सोबत असावी,
थंडीत त्याची साथ असावी, अस कुणीतरी जिवनात याव्
फक्त त्याचा चेहरा पाहील्यावर् ओठावार हास्य याव्,
कधीतरी रुसल्यावार् अलगद मिठीत घ्याव्

अजुनही आहे.

May 26, 2012

अजुनही........

अजुनही मनातून, तुझी छबि हटत नाही,
तू गेलास तरी, मी मात्र रडत नाही !

अजुनही माझ्याभोवती, तू वावरतोस,
तुझा स्पर्श हवेतून, अजुनही जाणवत आहे !

अजुनही आपली, मिलने आठवते,
भर पावसातही तरी, मी कोरडीच राहते !

अजुनही मी तुझीच आहे, अजुनही मनाला तुझीच ओढ़ आहे,
तू नक्की परत येशील, अशी खात्री या वेडीला,
अजुनही आहे !!

रातचांदण्या ओंजळीत....!!!

May 26, 2012
रातचांदण्या ओंजळीत....!!!

रातचांदण्या ओंजळीत माझ्या, सडा त्यांचा घालू दे,
तेजोमयी प्रकाशात त्या, प्रेम आपुले फुलू दे !

तुझ्या स्पर्शाने आज सख्या, स्पंदने माझी वाढू दे,
तुझ्या धुंद श्वासाने, माझी काया मोहरू दे !

थरथरती काया माझी, मिठीत तुझ्या स्थिराऊ दे,
माझ्यावरील तुझे प्रेम, आज मलाही समजू दे !

तुझ्या नजरेने मला, रोमांचित होऊ दे,
मलाही तुला थोडा, प्रतिसाद देऊ दे,
थोडा प्रतिसाद देऊ दे !!

सांग कधी कलनार तुला.

May 26, 2012
सांग कधी कलनार तुला

शब्द माझे होतील मुके जर न पोहोचले तुला
शब्द माझे पडतील थिटे होतील भार पानावरला
सांग कधी कलनार तुला भाव माझ्या शब्दातला

हे नेत्र काही बोलू पाहे शोधित तुझ्या नजरेला
पण अश्रु माझे क्रूर किती ओलावितात या डोळ्याला
मग सांग कसा कलनार तुला भाव माझ्या डोळ्यातला

गीत माझे तुझ्यासाठी प्रीत माझी तुझ्यासाठी
मग का कलेना तुला अर्थ त्या गीतातला
सांग कधी कलनार तुला भाव माझ्या सुरान्तला

विचार तुझा येता मनी हुरहुर लागे जिवाला
तारा बनुनी राहिलास तू माझ्या भाव विश्वातला
सांग कधी मिलनार का मला तारा माझ्या जीवनातला

विचार तुझे दाटुनी येती जरी धरला तू अबोला
तुझ्या मनी माझा विचार जरी असेल संपलेला
सांग कधी कलनार तुला भाव या अंध प्रेमातला

बाकी मात्र शुन्यच.

May 26, 2012
हिशोब दोन पावसाळ्यांचाबाकी मात्र शुन्यच...........
मित्र म्हणतात झाले गेले
विसर सगळे चालायला फक्त ओसाड रस्तेच आपले

तिची वाटच वेगळी रे हिरव्यागार रानातली
आपण फक्त आठवायची मनात जी जपलेली

अरे पण कसा विसरु मी रोजचे ते बोलणे
गोड तो चेहरा आणि तिचे ते हसणे

कसा मी विसरु स्वप्नांचे ते महाल
अरे उध्वस्त कर सारे आपला तो फक्त उजाड माळ

सहजच ती बोलुन जायची तुझ्याच मनाचे सारे खेळ
कळुन चुकले सारे तुला निघुन गेली जेव्हा वेळ

नको रडुस आता सावर रे स्वत:ला
नशीबाचा डाव सारा का कोसतोस स्वत:ला

कळतयं रे सगळं तरी कळतच नाही काही
खुप जगायंच आहे रे पण जगायला आता कारणच नाही

तिच्यात जग होतं माझे पण तिच्यासाठी मी नगण्यच
हिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच..........

प्रित जन्मोजन्मीची .

May 26, 2012
प्रित जन्मोजन्मीची ......... !!

विरहाची भीती सख्या, तुला का होती?
मी तर सतत, तुझ्या नजरेत होती !!

श्वासातल्या वादळाची, कशाला भीती?
त्या वादळातच दडलेय, तुझी माझ्यावरील प्रिती !!

श्वासाला तुझ्या होते, ते उसास्यांचे भास नव्हते,
तुझ्या श्वासात मिसळलेले, सख्या ते माझे श्वास होते !!

जन्मोजन्मीची प्रित आपुली, क्षणात विरून जाइल कशी?
स्वप्ने आपुली लाडक्या, मुक्याने रडतिलच कशी?

आठवणी राजा, ओरबडू नकोस,
राणीच काळीज, अस चिरु नकोस !!

आठवणी आपल्या, फुलान्परी कोमल,
प्रेमाला आपल्या नक्कीच, मिळेल केव्हातरी . ...... !!!

तु येणार आहेस.

May 26, 2012
तु येणार आहेस...
तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, झाडावरली कोकिळा जेव्हा गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा जमिनीवरुन वाहु लागते...
 
तुझ्या प्रेमासाठीच मला मरणा नंतरही जगायचं आहे's photo.
 
 

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, सुगरिणीचं पिलु जेव्हा खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, चंद्रासोबत चांदणीही जेव्हा अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस याची मला चाहुल लागते, भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी निरव शांतता पानोपानी, जेव्हा पसरु लागते...

तरीही मी उभाच आहे..

May 26, 2012
तरीही मी उभाच आहे.

अर्थ सर्वच संपून गेलाय तरीही जीवन सुरुच आहे
वेळ केव्हा निघून गेली मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा हाती काहीच उरले नाही
आता सर्व शांत झालयं वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत फक्त माझ्यासाठी
त्यावरच तर जगतो आहे हसतो आणि रडतो आहे
एकच गोष्ट फक्त मी माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी फक्त तुझ्यासाठी झुरलो
आजही मला एकच फक्त सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही तुझी उणीव भासतेय....

तू सोबत हवा .

May 26, 2012
तू सोबत हवा.......माझी नजर तू स्वप्न,
माझ्या डोळ्यात तू , चमकायला हवा !
माझा रंग, तुझ्या छटा, माझ प्रेम, माझी माया,
त्यावरही असतेच ना, तुझीच छाया !
माझे पंख, माझा थवा, त्यांना बळ द्यायला,
तू साथीला हवा ! माझे आकाश, माझे क्षितिज,
यांच्या पुढे न्यायला, तू सोबत हवा !! 

माझे मरण.

May 26, 2012
माझे मरण

होता श्वासात तेव्हा, नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही, तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर, तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन, तर, आले सगळे टाहो फोडायला,
आज पहा माझा काय थाट! लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड, आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,
जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र, नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी, ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,
जन्मभर लाथा मारून गेले जे मला, आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी, आज चौघे-चौघे आले मला धरायला,
आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?, आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी, आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

कधीतरी पहाटे.

May 26, 2012
कधीतरी पहाटे

एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी, यासारखं सुख ते काय?

कधीतरी भांडताना एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?

कधीतरी रविवारी सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?

कधीतरी रडताना तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?

कधीतरी लढताना सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?

कधीतरी चुकताना मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?

कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?

कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस असं म्हणता यावं
यासारखं आयुष्य ते काय?

अशीही माझी एक मैत्रीण असावी.

May 26, 2012
अशीही माझी एक मैत्रीण असावी,
एक-दोन भेटितच मनात घर करून बसावी...

रितं-रितं मन सारं आनंदाचं गोकुळ होईल,
घराचा ताबा म्हणुन मी ही को-या स्टैंपवर सह्या देईल,,
इत्थंभुत सर्व formalities complete करावी, प्रेमानं तिनं हि पहिली अट ऐकावी ...
घरात तिच्या जागा नाही मला म्हणुन थोडं-थोडकं मी हि कधी रागवेन,
कराराने नाही पण भाडे तत्वावर तरी जागा मागेन,,
दर महिन्याला भाडेपट्टी मात्र वसुल करावी, प्रेमानं तिनं हि दुसरी अट ऐकावी ...
घर मोठं असलं तरी छोटयाश्या कोप-यातही मी मावेन,
सतत सुवास दरवळावा म्हणुन बगीच्यात जाई-जुई, केवडा अन् निशिगंधाही लावेन,,
या सा-या फुलांनी घरात प्रसन्नता ठेवावी, प्रेमानं तिनं हि तीसरी अट ऐकावी...
घराचा ताबा मी मागणार नाही याची तिला अजिबात काळजी नसावी,
काळजी मुक्त राहुनी नेहमी गोड-गोड हसावी,, उगाच दु:खाची रडगाणी कधी गाणार नाही,
प्रेमानं तिनं हि चौथी अट ऐकावी ...मरणोप्रांत अंत्ययात्रा माझी तिने घरुनच काढावी,
अंगणातल्या बगीचातीलच फुले चीतेवरती चढवावी,,फार त्रास न घेता, चार-दोन अश्रूच ती रडावी,
प्रेमानं तिनं हि पाचवी अट ऐकावी ...

अशीही माझी एक मैत्रीण असावी,
एक-दोन भेटितच मनात घर करून बसावी..

असच चालत रहायच.

May 26, 2012
स्वप्न पाहिली आकाशाची भूमीच आली हाती
समजत नाही हे जीवन आपण जगतोय कशासाठी?

मनाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा सापडली वाट
वाट कसली हो ती जिला नाही कोणताच माप

ठरवलय मी आता असच चालत रहायच
वाटेत आलेले दगड सोडून  प्रवाहा बरोबर वहायच

पहायचय हे जीवन आपणास न्हेत तरी कुठे
मिळेल का एखादा विसावा या पोळलेल्या मनास जिथे?

कल्पनेतली परीच ती.

May 26, 2012
कल्पनेतली परीच ती
ठाउक नाही कशी ती दिसते अशी ती असते,
कल्पनेतुनी वास्तवात येई तशी ती कधीच नसते...

वेळी-अवेळी पाउस पडता आनंदाने सदैव भिजते
अशी ती असते, भिजता-भिजता
वाहून जाई तशी ती कधीच नसते...

मदतीस तयार परांच्या मेणापरी जळुनी थिजते
अशी ती असते, थिजता-थिजता
उरुन जाई तशी ती कधीच नसते...

रात्रीस फुलांच्या कुशीत चिरनिद्रेस ती निजते
अशी ती असते, निजता-निजता
स्वप्नात विरून जाई तशी ती कधीच नसते...

उंच अवकाशी उड़ता क्षणात काळ्या मातीत रूजते
अशी ती असते, रुजता-रुजता उमलणे विसरुनी जाई
तशी ती कधीच नसते...

कल्पनेतली परीच ती वास्तवात कधीच नसते...
वास्तवात कधीच नसते...


तुझ्याविना.

May 26, 2012
तुझ्याविना माझी सगळी वस्तीच बकाळ झाली,

विचार करता करता न कळत सकाळ झाली..


जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...

काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!


तुझ्या घरावरून जातानाहल्ली तिकडे नजर वळत नाही...

मनाचे ठीक आहे गपण आसवांना काहीच कळत नाही.........


तुझा विचार करणं आता नकोसं वाटतं

अस म्हणून मन माझं मलाच फ़सवतं


कधी कधी मला वाटतंमी अजरामर असेन

झाली जर का जगबुडी तर तुमची वाट बघत बसेन


मला माहित नसलेलं दुःख माझ्या मनात साठून आहे

बरेचदा मी विचार करतो नक्की याचा ओघ कुठुन आहे


आनंदाचे क्शण लवकर संपतात आठवणी बनून मनात साठतात

हे दिवसही असेच संपतील आठवणी होउन पुन्हा बोचतील...

दीप मझ्या आठवणींचा जाशील तिथे सांभाळ

कोण जाणे आयुष्याची केव्हा होइल संध्याकाळ...


सुवर्णाच्या पावलांनी लक्ष्मी म्हणून नव्या घरात शिरायच

हातावरच्या पुसट होणार्‍या रंगासवे माहेराला विसरायचं....

तू जवळ असतीस तर.

May 26, 2012
तू जवळ असतीस तर,
कदाचीत स्वप्नांमध्ये जगत नसतो..
पण मग, वास्तवात तरी कुठं जगत असतॊ...
कदाचीत स्वप्न अन वास्तव यांच्यातील दूवा तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....
तू जवळ असतीस तर,कदाचीत एकटाच गुणगूणत नसतो...
पण मग, तुझ्या आवाजात तरी कसा मुरलॊ असतॊ...
कदाचीत माझ्या मनाचा आवाजच तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....
तू जवळ असतीस तर,कदाचीत असा गुमसूम बसत नसतॊ...
पण मग, भानावर तरी कुठं असतॊ...
कदाचीत माझ्या भावनांचा आधारचं तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस...
तुझ्या दूराव्याचं कारण मला माहित आहे..
अन तुझ्या आठवणींचं वास्तव्य देखील माझ्याजवळ आहे...
पण तुझ्या वास्तव्यातही तर माझ्याच आठवणी आहेत...
कदाचीत आपल्या आठवणीचं आपलं वास्तव्य आहे...
कारण वस्तव्यात जरी नसलीस तरी,आठवणींत तू माझ्या अन मी तुझ्या जवळ आहे....

दूरावा म्हणजे प्रेम...

May 26, 2012
दूरावा म्हणजे प्रेम...

अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम..दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा..दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन,
ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...
दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

दूरावा म्हणजे प्रेम...

तुझ्याविना तु गेल्या नंतर.

May 26, 2012
तुझ्याविना माझी सगळी वस्तीच बकाळ झाली,
विचार करता करता न कळत सकाळ झाली..
जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...
काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!
तुझ्या घरावरून जातानाहल्ली तिकडे नजर वळत नाही..
मनाचे ठीक आहे गपण आसवांना काहीच कळत नाही.........
तुझा विचार करणं आता नकोसं वाटतं
अस म्हणून मन माझं मलाच फ़सवतं
कधी कधी मला वाटतंमी अजरामर असेन
झाली जर का जगबुडी तर तुमची वाट बघत बसेन
मला माहित नसलेलं दुःख माझ्या मनात साठून आहे
बरेचदा मी विचार करतो नक्की याचा ओघ कुठुन आहे
आनंदाचे क्शण लवकर संपतात आठवणी बनून मनात साठतात
हे दिवसही असेच संपतील आठवणी होउन पुन्हा बोचतील...
दीप मझ्या आठवणींचा जाशील तिथे सांभाळ
कोण जाणे आयुष्याची केव्हा होइल संध्याकाळ...
सुवर्णाच्या पावलांनी लक्ष्मी म्हणून नव्या घरात शिरायच
हातावरच्या पुसट होणार्‍या रंगासवे माहेराला विसरायचं....

मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं.

May 26, 2012
वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलं
आवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलं,
म्हणाली चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतो
चांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?
टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झाला
नेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झाला
आता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराण
दुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराण
मग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालं
विचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलं
एक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?
Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?
शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकी
प्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकी
लग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटली
हसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटली
प्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसते
कारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,
ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते.

वयात जे जे करायचं .

May 26, 2012
ज्या ज्या वयात जे जे करायचं त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावायचं
तरुण वयात 'पाखरां'च्या मागे धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...

ज्या ज्या वयात जे जे करायाचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निवृत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!
लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथे मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुध्दा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात साऱ्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं! तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात!
वाऱ्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणाऱ्या मेघासारखं बोलकं होता यायला हवं
अंधाराच्या गर्भामधे ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी!
कुठल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...
तरीही...ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं!

तू तो प्रयत्न करून पाहा.

May 26, 2012
चार पावलं आपणसोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर कुठवर जुळतात पाहु...
अर्थात जमत असेल तर चलमी
आग्रह करणार नाहीआज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाहीपण मनातल्या मनात कुढण्या पेक्षा व्यक्त
करणं बरं असतं कारण इथून तिथून ऐकलेलं सारंच
काही खरं नसतं कुणी कुणाला का आवडावंहे सांगता
येत नाहीचार चौघांना विचारून कुणीहृदय देत नाहीतसंच
काहीसं माझं झालंत्याच धुंदीत propose केलंजवळ अशी
कधी नव्हतीसंच propose ने आणखीच दूर नेलंजे झालं ते वाईट
झालंपण झालं ते बरंच झालंखरं सांगणं गुन्हा असतो एव्हढं मात्र
लक्षात आलं जाऊ दे,झालं गेलं विसरून जामागे न वळता
चालत राहा मला विसर असं मी म्हणणार नाहीपण
तू तो प्रयत्न करून पाहा...थांब...इथून पुढं मला एकट्यालाच जायचंयपण

धन्यवाद; तू इथवर आलीस...सारं आयुष्य नसलीस तरीचार पावलं माझी झालीस...

नकळतच.

May 26, 2012
शब्दाचं बोट धरून भावना कागदावर अलगद उतरली,
मनातल्या चिमुकल्या बीजातून कवितेची वेल बहरली!
कवितेच्या वेलीला कवितांच्याच कळ्या आल्या,
भावनांच्या रेशीमगाठी अजून-अजून मोकळ्या झाल्या!
एके दिवशी कळ्यांतून मोहक फुलं उमलली,
मनातली अनेक कोडी कवितांनीच उकलली!
कवितेची बकुळफुलं कोमेजूनही फुललेली,
नकळतच दिसली मनाची बंद दारं खुललेली.

Labels

"ILOVE U " म्हणावं "ILOVE U " म्हणावं. "शब्दान्ची" गरज नसते 7 most beautiful promises 7 most beautiful promises. Aayushyatale kahi kalat nahi Believe me FilmActor For my Love galliyan teri galliyan Ham tere bin Ho g... Ho na Ho na. I imagine your smiling face I imagine your smiling face. I love you I LOVE YOU TOOO I love you. I LoveYou आई I LoveYou आई. I M Sorry. I miss u shona I miss u shona ... Jaadu hai nasha hai Jab tak hai jaan Jab tak hai jaan. Keep loving truly Lahu munh lag gaya M.C.A झाल्यावर Maine Pyar Kiya. Marathi Kavita miss करतोय miss करतोय. President Pyar Hua.. Rose Day SMS Saint Valentine Shiv Sena shwas tu sorry रे शोन्या sorry रे शोन्या. Teri galliyan Valentines Day VERTICAL SLIDER अखेर मी जिंकलो अगदी खरं आहे अगदी खरं आहे. अजुन काय हवं असतं अजुन काय हवं असतं.. अजुन काय हवे असते अजुन सुंदर होईल अजुनही अजुनही. अजून कोणीच नसाव अजून कोणीच नसाव. अजून जगावस वाटत अजूनही आहे अंतरी ऊरून आहे अधुरे प्रेम अधुरे प्रेम. अनपेक्षित अनपेक्षित भेट अनपेक्षित. अनेक माणसं भेटतात अनेक माणसं भेटतात. अपराधी मीचं आहे अपराधी मीचं आहे. अपूर्ण प्रेम आपल अरे संसार संसार अर्थच थोडा वेगळा आहे अर्थच थोडा वेगळा आहे. अवघड जातोय अविस्मरणीय संध्याकाळ अशिच येशिल तु तेव्हा अशिच येशिल तु तेव्हा. अशी असावी ती अशी असावी ती. अशी असावी माझी प्रेयसी अशी आहे माझी प्रेयसी अशी काही हसतेस तू अशी काही हसतेस तू . अशी कोणी असेल का अशी कोणी असेल का. अशी गोड तू. अशी हवी जरी अशीच आहे ती अशीच नाती मी जपणार अशीच नाती मी जपणार . अशीच यावी वेळ एकदा अशीच यावी वेळ एकदा. अशीही माझी एक मैत्रीण असावी अशीही माझी एक मैत्रीण असावी. अश्या या पोरी असतात अश्रूंची