शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम ...

शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम ...
ते डोळ्यांनी साधायचं असतं ,
आपल कुणी झालं नाही तरी ...
आपण कुणाचंतरी व्हायचं असतं ...
खरचं प्रेमाचा अर्थ इतका व्यापक आहे ?
प्रकाशासाठी स्वतः जळणारा तो दिपक आहे ...
कोवळ्या इंद्रधनूसारखी मनाचा ठाव घेणारी ,
प्रेमाची ही कल्पनाचं किती कल्पक आहे...
अर्थहीन जीवनाला नवा अर्थ म्हणजे प्रेम ,
तहानलेल्या भूमीला पावसाचा स्पर्श म्हणजे प्रेम ...
अमावस्येच्या अंधाराची समिक्षा घेत ,
निखळ चंद्राची प्रतिक्षा म्हणजे प्रेम ...
म्हणूनच ...
जीवनात हवा असतो कुणाचातरी सहवास ,
गर्द माळरानातल्या एकट्या गुलाबाची आस ...
विरहाचे दुःख डोळ्यात लपवूनही ,
भिजलेले डोळे करतात मन उदास ....
शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम ... शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम ... Reviewed by Hanumant Nalwade on May 28, 2012 Rating: 5
Powered by Blogger.