"तू माझ्याबरोबर नसशील तर मी दुरावून जातो
माझ्यामधला मी हिरावून जातो
कुठलेही कार्य करण्याचे उमेद विरून जाते
तू बरोबर नसल्यावर....

तू बरोबर नसल्यावर....
काळाचे भान राहत नाही
वेळचा पत्ता लागत नाही

तू बरोबर नसल्यावर...
हसतानाही मी रडतच असतो
जगण्यात रस वाटत नाही
तू बरोबर नसल्यावर...

पण तू बरोबर असल्यावर
सगळे काही सोपे होते
सगळे दुखः विरून जाते
दिवसाही चंद्रमा भासू लागतो तू बरोबर असल्यावर.......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top