Showing posts with label जीवन असतं का. Show all posts
Showing posts with label जीवन असतं का. Show all posts

Monday, June 2, 2014

एक जीव

"एक अश्रू.."
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..तो अश्रू..हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..पण वाहत मात्र नाही,

एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं..

एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..मागे वळून ..पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..तुझ्याशिवाय मोकळी..

एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..अशी आस लावणारा..

एक जीव..
तडफडणारा..असहाय्य..तुझ्याविना..तुझ्याचसाठी...

Sunday, August 18, 2013

जीवन असतं का

हेच जीवन असतं का ???
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अपयश झेलायचं , तरीही रोज पुन्हा नव्या उमेदीने उठायचं ...
हेच जीवन असतं का ???
सुखाच्या क्षणांना फक्त हाय-बाय करायचं ,आणि दुःखाशी मात्र घट्ट नातं ठेवायचं ....
हेच जीवन असतं का ???
कोणाकडून अपेक्षा न ठेवता, त्यांच्या अपेक्षांचं भान ठेवायचं साऱ्या इच्छा मनात ठेवून कुढत कुढत जगायचं ...
हेच जीवन असतं का ???
नको असलेल्या गोष्टींमध्येच समाधान मानायचं प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीव तुटेपर्यंत झगडायचं ...
तुम्हीच सांगा ........
खरंच हेच जीवन असतं का ???

Thursday, August 15, 2013

जीवन नाही

मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...
मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...
मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...
मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...
मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...
मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...
मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...