मन हे असे का असते.

मन हे असे का असते असूनही स्वतःचे दुसर्‍याचे का भासते

असूनही सर्वांमध्ये एकाकी त्याचाच विचार करणारे,
दिसणार्‍या प्रत्येक चेहर्‍यात त्याचाच चेहरा पाहणारे,
नसता जवळी तो उगीच वेड लावते
मन हे असे का असते ????

नाही येणार तो माहीत असूनही तासन तास सैरभैर वाट पाहणारे,
आजतरी माझ्यासाठी त्याला वेळ मिळू दे
म्हणून देवाला प्रार्थना करणारे, खोटी आस लावून स्वतःच स्वतःला फसवते
मन हे असे का असते ????

किती वेळा समझावे ह्याला नाही इथे कुणी कोणासाठी,
नाही आहे वेळ इथे कुणाला क्षणभरही तुझा विचार करण्यासाठी,
जाणते हे सर्व तरी त्याच्यासाठीच झुरते
मन हे असे का असते ????
मन हे असे का असते. मन हे असे का असते. Reviewed by Hanumant Nalwade on May 27, 2012 Rating: 5
Powered by Blogger.