तुझी काळजी घेणारा मी एकटाचं असेन

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुःख घेणारे बरेचं
असतील,

पण ?????

ओढणी सांभाळ सांगणारा कदाचित
मी एकटाचं असेन..

तुला हसवणारे बरेचं असतील,

पण ?????

तुझ्यासाठीचं तुझ्यावर
चिडणारा कदाचित मी एकटाचं
असेन..

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट
पाहणारे बरेचं
असतील,

पण ?????

जपून चाल सांगणारा कदाचित
मी एकटाचं असेन..

हसत-हसवत तुला टाळी देणारे बरेचं
असतील,

पण ?????

तू रडताना, तुझा हात हातात घेऊन धीर
देणारा कदाचित
मी एकटाचं असेन..

तुला कळावं म्हणून तुझी काळजी घेणारे बरेचं
असतील,

पण ?????

तुझ्या नकळत
तुझी काळजी घेणारा मी एकटाचं असेन..
Previous Post Next Post