तुम्ही कुणा खास व्यक्तीबरोबर असता , तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवत .
पण ती व्यक्ती जवळपास नसते, ... तेव्हा तुमची नजर त्याला शोधत असते.
हं ... तुम्ही प्रेमात पडलाय हे नक्की

तुम्हाला हसवणारं कोणीतरी तिथे असतं, तरी तुमचं लक्ष मात्र दुसर्‍याच खास व्यक्तीकडे असतं .
तुम्ही नकीच प्रेमात पडलायत.

खरं तर त्याने खुप आधीच तुम्हाला त्याच्या येण्याची वर्दी द्यायला हवी होती ,
पण तुमचा फोन काही वाजत नाही. तुम्ही मात्र त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघत असता.
नक्कीच तुम्ही प्रेमात पडलाय ....

तुमच्या मेलबॉक्समध्ये त्याचे भरपुर मेल / मॅसेजेस आलेले असतात ,
पण मेलबॉक्सची कॅपॅसिटी संपली तरी तुम्हाला ते इरेज करावेसे वाटत नाहीत.
तेव्हा तुम्ही नक्कीच प्रेमात असता .

' तो फक्त माझा चांगला मित्र आहे ' तुम्ही स्वतःलाच बजावत असता ,
तरीही त्याचे विचार टाळता येत नाहीत. म्हणजे तुम्ही नक्कीच प्रेमात असता.

आता हे वाचतानाही जर कोणी तुमच्या मनात डोकावत असेल ...
तर .....................तर यू आर इन लव्ह !!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top