मी नाही म्हणत.

मी नाही म्हणत.... तू फक्त माझं असावं... पण माझ्या जीवनात मात्र तुझ्याखेरीज कुणी नसावं... 
मी नाही म्हणत.... तू मलाच आठवावं..पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात राहावं..
 मी नाही म्हणत.... तू मला मनात ठेवावं... पण माझ्या मनी मात्र तूच वसावं... 
मी नाही म्हणत.... तू माझ्यासाठी रडावं....पण माझी पापणी मात्र तुझ्याचसाठी भिजावं.. 
मी नाही म्हणत.... तू मला प्रेम कराव... पण कधीतरी तुलाही माझ्याचसारखा प्रेम व्हाव... 
मी नाही म्हणत.... तू कधी हसू नये.... पण माझ्यासाठी हसण्याचे कारण मात्र तूच असावं.. 
मी नाही म्हणत.... तू मला भेटावं..पण माझ्यासाठी ती भेट मला सुखी करून जावं... 
मी नाही म्हणत.... कधी तू माझ्यासाठी कविता रचावी... पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी.... 
मी नाही म्हणत.... कधी तुला मीच दिसावं.... पण मला, डोळे बंद होताच स्मरणात तुझाच चित्र रेखातावं... 
मी नाही म्हणत.... कधी तुझी भावना तुझ्यापासन दूर जावी.. पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली.... 
मी नाही म्हणत.... तुझ जगन माझ्यासाठी बदलावं... पण माझं स्वप्न जगणं हे तुझ्याकुशीत पूर्ण व्हाव... 
मी नाही म्हणत.... माझ्या भावनानसोबत खेळू नको... पण माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस... मी एवढच म्हणते.... माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी.... अन पुढच्या जन्मीतरी तु माझा अन मी तुझी बनून याव...

Share on Google Plus

About Hanumant Nalwade