रोज स्वःताला.

रोज तुला विसरतो, रोज तुला आठवतो..
रोज काहीतरी ठरवतो, रोज काहीतरी मिटवतो..
रोज स्वःताला सोपवतो, रोज स्वःताला परत मागतो..
रोज तुझी अपेक्षा करतो, रोज स्वःताची उपेक्षा करतो..
रोज रात्री जागवतो, रोज पहाट लांबवतो..
रोज स्वःताला थांबवतो, रोज स्वःताला सोडवतो..
रोज शहानपण दाखवतो, रोज वेड्या सारखा वागतो,
रोज बावरतो, रोज़ सावरतो..
रोज तुझ्यातचं हरवतो, रोज तुझ्यातचं सापडतो..
रोज स्वःताला संपवतो,रोज स्वःताला जगवतो..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade