का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
खरे प्रेम असुनही माझे ते न मिळावे..
कदाचित माझे नशिबचं फुटके असावे,
का बरं मी आता का पुन्हा प्रेमात पडावे..
का कुणी सोडून गेल्याचं दुःख करत बसावे,
का बरं मी पुन्हा खोट्या नात्यात फसावे..
त्याच्या खोट्या रुसण्यावर का मी मनवावे,
का बरं मी कुणासाठी उगाचं झुरावे..
त्याला मिळवण्यासाठी देवाकडे
प्रेमाची भिक का मागावे,
तो नाही मिळाल्यावर त्याची आठवण
काढुन रडत बसावे..
मग त्याला विसरण्यासाठी नको नको फसवे
प्रयत्न करावे,
का बरं माझ्यासोबत असे घडावे ??
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..
आता असं वाटतं कुठे दूरजाऊन शांतपणे
मरावे..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top