रातचांदण्या ओंजळीत....!!!

रातचांदण्या ओंजळीत....!!!

रातचांदण्या ओंजळीत माझ्या, सडा त्यांचा घालू दे,
तेजोमयी प्रकाशात त्या, प्रेम आपुले फुलू दे !

तुझ्या स्पर्शाने आज सख्या, स्पंदने माझी वाढू दे,
तुझ्या धुंद श्वासाने, माझी काया मोहरू दे !

थरथरती काया माझी, मिठीत तुझ्या स्थिराऊ दे,
माझ्यावरील तुझे प्रेम, आज मलाही समजू दे !

तुझ्या नजरेने मला, रोमांचित होऊ दे,
मलाही तुला थोडा, प्रतिसाद देऊ दे,
थोडा प्रतिसाद देऊ दे !!
रातचांदण्या ओंजळीत....!!! रातचांदण्या ओंजळीत....!!! Reviewed by Hanumant Nalwade on May 26, 2012 Rating: 5
Powered by Blogger.