कधी असे ही जगुन बघा........


माणूस म्हणुन जगताना हा हिशोंब करुन तर बघा
"किती जगलो ?" याऐवजी " कसे जगलो"? जा एक प्रश्न जरा मनाला विच्रून तर बघा
कधी असे ही जगुन बघा....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करुन तर बघा
तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसून बघा
कधी तरी असे ही हसून बघा....

संकटामुले खचून जाणारे शेकडोनी मिळतात कधीतरी अड़चनीवर मात करण्याची हिम्मत करुन तर बघा
स्वतापुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काडीचा आधार होवून तर बघा
कधी तरी असे ही जगुन बघा....

वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचिच असते कधीतरी भुतकालच्या विश्वात रंगून तर बघा
कालाची वालू हातातून निसटली म्हणुन काय झाले? आधी अनुभवलेला क्षण पुन्हा जगुन तर बघा
कधी तरी असे ही जगुन बघा....

प्रतिसादाची कालजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मल,एकतर्फी "प्रेम" करुन तर बघा........
Share on Google Plus

About Hanumant Nalwade