कल्पनेतली परीच ती.

कल्पनेतली परीच ती
ठाउक नाही कशी ती दिसते अशी ती असते,
कल्पनेतुनी वास्तवात येई तशी ती कधीच नसते...

वेळी-अवेळी पाउस पडता आनंदाने सदैव भिजते
अशी ती असते, भिजता-भिजता
वाहून जाई तशी ती कधीच नसते...

मदतीस तयार परांच्या मेणापरी जळुनी थिजते
अशी ती असते, थिजता-थिजता
उरुन जाई तशी ती कधीच नसते...

रात्रीस फुलांच्या कुशीत चिरनिद्रेस ती निजते
अशी ती असते, निजता-निजता
स्वप्नात विरून जाई तशी ती कधीच नसते...

उंच अवकाशी उड़ता क्षणात काळ्या मातीत रूजते
अशी ती असते, रुजता-रुजता उमलणे विसरुनी जाई
तशी ती कधीच नसते...

कल्पनेतली परीच ती वास्तवात कधीच नसते...
वास्तवात कधीच नसते...


Previous Post Next Post