तरीही मी उभाच आहे..

तरीही मी उभाच आहे.

अर्थ सर्वच संपून गेलाय तरीही जीवन सुरुच आहे
वेळ केव्हा निघून गेली मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा हाती काहीच उरले नाही
आता सर्व शांत झालयं वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत फक्त माझ्यासाठी
त्यावरच तर जगतो आहे हसतो आणि रडतो आहे
एकच गोष्ट फक्त मी माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी फक्त तुझ्यासाठी झुरलो
आजही मला एकच फक्त सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही तुझी उणीव भासतेय....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade