प्रेम करतेस खरोखर !

प्रेम करतेस खरोखर ! होशील जन्माची जोडीदार,
तर आताच विचार कर..
मी चालेन सरळ मार्गावर, तुला ठेच लागलीच तर,
फोडू नकोस खापर माझ्यावर..
जीवनातील आगंतुक अपयशाचे, करणार असशील गैरसमज तर,
आताच पक्का निश्चय कर...
देतो तुज मी आश्वासन, करीन अर्पण अंतःकरण
फुलासम जपेन तव मन...
आश्वस्त हो, निर्धास्त हो फुलविन,फक्त सुगंध देईन,
तुझं सारं दुःख मी वाहीन...
प्रेम करतेस माझ्यावर ! फक्त सुखद झुळूक येऊ देईन,
उष्मा सारा मी गिळून घेईन...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top