तू जवळ असतीस तर.

तू जवळ असतीस तर,
कदाचीत स्वप्नांमध्ये जगत नसतो..
पण मग, वास्तवात तरी कुठं जगत असतॊ...
कदाचीत स्वप्न अन वास्तव यांच्यातील दूवा तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....
तू जवळ असतीस तर,कदाचीत एकटाच गुणगूणत नसतो...
पण मग, तुझ्या आवाजात तरी कसा मुरलॊ असतॊ...
कदाचीत माझ्या मनाचा आवाजच तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस....
तू जवळ असतीस तर,कदाचीत असा गुमसूम बसत नसतॊ...
पण मग, भानावर तरी कुठं असतॊ...
कदाचीत माझ्या भावनांचा आधारचं तू असतेस...
जेव्हा तू माझ्यापासून दूर असतेस...
तुझ्या दूराव्याचं कारण मला माहित आहे..
अन तुझ्या आठवणींचं वास्तव्य देखील माझ्याजवळ आहे...
पण तुझ्या वास्तव्यातही तर माझ्याच आठवणी आहेत...
कदाचीत आपल्या आठवणीचं आपलं वास्तव्य आहे...
कारण वस्तव्यात जरी नसलीस तरी,आठवणींत तू माझ्या अन मी तुझ्या जवळ आहे....
तू जवळ असतीस तर. तू जवळ असतीस तर. Reviewed by Hanumant Nalwade on May 26, 2012 Rating: 5
Powered by Blogger.