अशीही माझी एक मैत्रीण असावी.

अशीही माझी एक मैत्रीण असावी,
एक-दोन भेटितच मनात घर करून बसावी...

रितं-रितं मन सारं आनंदाचं गोकुळ होईल,
घराचा ताबा म्हणुन मी ही को-या स्टैंपवर सह्या देईल,,
इत्थंभुत सर्व formalities complete करावी, प्रेमानं तिनं हि पहिली अट ऐकावी ...
घरात तिच्या जागा नाही मला म्हणुन थोडं-थोडकं मी हि कधी रागवेन,
कराराने नाही पण भाडे तत्वावर तरी जागा मागेन,,
दर महिन्याला भाडेपट्टी मात्र वसुल करावी, प्रेमानं तिनं हि दुसरी अट ऐकावी ...
घर मोठं असलं तरी छोटयाश्या कोप-यातही मी मावेन,
सतत सुवास दरवळावा म्हणुन बगीच्यात जाई-जुई, केवडा अन् निशिगंधाही लावेन,,
या सा-या फुलांनी घरात प्रसन्नता ठेवावी, प्रेमानं तिनं हि तीसरी अट ऐकावी...
घराचा ताबा मी मागणार नाही याची तिला अजिबात काळजी नसावी,
काळजी मुक्त राहुनी नेहमी गोड-गोड हसावी,, उगाच दु:खाची रडगाणी कधी गाणार नाही,
प्रेमानं तिनं हि चौथी अट ऐकावी ...मरणोप्रांत अंत्ययात्रा माझी तिने घरुनच काढावी,
अंगणातल्या बगीचातीलच फुले चीतेवरती चढवावी,,फार त्रास न घेता, चार-दोन अश्रूच ती रडावी,
प्रेमानं तिनं हि पाचवी अट ऐकावी ...

अशीही माझी एक मैत्रीण असावी,
एक-दोन भेटितच मनात घर करून बसावी..

अशीही माझी एक मैत्रीण असावी. अशीही माझी एक मैत्रीण असावी. Reviewed by Hanumant Nalwade on May 26, 2012 Rating: 5
Powered by Blogger.