हवी तुझी साथ मला चान्दणराती जागताना
पिठुर शुभ्र चान्दण्या मनसोक्त फिरताना

हवी तुझी साथ मला धुवाधार पाउस बरसताना
अन्गणात पडलेल्या गारा ओन्जळीत वेचून घेताना

हवी तुझी साथ मला शब्द शब्द बान्धताना
अक्षरान्ची गुम्फुन माला सुरेल गीत छेडताना

हवी तुझी साथ मला जीवनगाणी गाताना
एकेक पदर आयुष्याचा हलकेच पलटून टाकताना.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top