प्रेमाच वारं

तुझ आणि माझ कधीच जमलं नव्हत
कारण.....प्रेमाच वारं तुझ्या कडून माझ्याकडे कधी फिरलच नव्हत.

मी किनारा होतो, तू पाणी होतीस
पण प्रेमाच्या सागराला मात्र ओहोटीच होती……
म्हणूनच प्रेमाची लाट ह्या किनाऱ्याला कधी येउन मिळालीच नव्हती.


तू पावसाची रिमझिम होतीस, मी वाट पाहणारा चातक…
पण.....प्रेमाचा मात्र दुष्काळ होता
म्हणूनच तुझ्या पावसाची सर माझ्या चोची पर्यंत कधीच पोहचली नव्हती.


तू सुसाट मात्र डौलान धावणारी Express होतीस
मी तुझ्या वाटेत येणार छोटस Station होतो
पण…… चुकुनही प्रेमाचा Signal मात्र तिथे कधी लागलाच नव्हता
म्हणून तू तिथे कधी थांबलीच नव्हतीस.


मी बसुरीतली पोकळी होतो,तू त्यातून जाणारी फुंकर होतीस
पण… प्रेमाची फुंकर त्यातून मात्र कधी गेलीच नव्हती
म्हणूनच तुझ्या आणि माझ्या प्रेमाची मैफिल कधी जमलीच नव्हती .
Share on Google Plus

About Hanumant Nalwade