बघ तारा तुटताना दिसेल

कधीतरी तुझी मुकी होइल वाणी आठवतील तुलाही आपली सोबत गायलेली गाणी
दाटून येइल सखे तुझाही कंठ ना दवा कामा ना मिळेल तुला सुंठ
शब्द होतील मुके मुके अन डोळ्यात दाटेल पहटाचे धुके
हात जाईल पदराला पुन्हा पुन्हा सांगशील का गेलीस सोडून एकट्याला
झाला काय गुन्हा ? थांब तेंव्हा रडू नको अश्रुना गाळु नको
एकटी राहू नको जरा गच्ची वर जा
आभाळ बघ चांदण्या मोज आठवत तुला त्या आपल्या नक्षत्रा पासून
उजवी कड़े तुझ अन डावी कड़े माझे ...आपण वाटुन घेतलेल आभाळ
रोज रात्री आपण मोजयचो त्या ता-यांना.. आजही पुन्हा मोज
बघ तुझ्या आजही तितक्याच भरतील माझ्या मात्र एक एक करून गळुन चालल्यात
तुझ्या सा-या विश पूर्ण होण्यासाठी ... आता हस पुन्हा एक विश कर ...

बघ तारा तुटताना दिसेल ...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top