डोळ्यांतून नकळत पाणी येतं

आजही आठवण आली तुझी की,माझ्या डोळ्यांतून नकळत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस  जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना  मनात घोळवावं लागतं..


आठवण आली तुझी की,वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं......

पण सलतं मनात ते दुःख  जाणवतं आहे ते अशक्य...…
कारण देवानेच नेलयं  माझं ते सौख्य पण तरिही………

आठवण आली तुझी की,देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या  जन्मी मिळू देत ते पुढच्या जन्मी….....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade