तु जिंकावं म्हणून.

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाहायचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाहायचं होतं
चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नव्हतं
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडी तहि फिरवायचं होतं
सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं
काहीच कसं वाटत नव्हतं....
तु जिंकावं म्हणून. तु जिंकावं म्हणून. Reviewed by Hanumant Nalwade on May 28, 2012 Rating: 5
Powered by Blogger.