तुला काय वाटल.

तुला काय वाटल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस, तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे  नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही, तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत, पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस, तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो, हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस, माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल, एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते, बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले, तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप miss करतो!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade