तीला सांगेल का हे कुणी?
तीच्याविना आहे माझी प्रत्येक मैफील सुनी.
तीला सांगेल का हे कुणी?
तीला सांगेल का हे कुणी?

सांगायचे तीला आज मी रोज ठरवतो,
पण ती येता समोर मजला घामच फुटतो.
ओठांवरचे शब्दही जाती ओठांतून परतुनी..!!
तीला सांगेल का हे कुणी?
तीला सांगेल का हे कुणी?

तीचे बोलणे फक्त वाटते ऎकत रहावे,
तीने हसता ितच्या गालाची खळीच व्हावे.
तीने आिण ितनेच यावे माझ्या स्वपनातुनी..!!
तीला सांगेल का हे कुणी?
तीला सांगेल का हे कुणी?

कधी वाटते असतील आमुची जिवलग नाती,
कधी भासते कुणी दूरची अनोळखी ती.
उगाच मजला छळण्याची की खोड तीची ही जुनी!!
तीला सांगेल का हे कुणी?
तीला सांगेल का हे कुणी?

तीलाही कळते सारे मजला ठाऊक आहे,
खाञी नाही तरीही आशा अंधुक आहे.
भाव मनीचे आज ना उद्या घेईल ती समजुनी..!!
तीला सांगेल का हे कुणी?
तीला सांगेल का हे कुणी?

गूगल ऐडवर्ड्स

 
Top