नकळत तिची आठवण आली.....

असाच एकदा एकांतात बसलो असताना........ नकळत तिची आठवण आली,

अन् डोळयांसमोर जणू तिची प्रतिमाच तयार झाली.....तिला पाहून......
मनाला खुप काही बोलायचे होते, पण ओठातुन शब्द निघत नव्हते......
डोळयांतही पाणी जमा झाले होते, पण अश्रु गळत नव्हते.....
श्वासही अजुन चालू होता, पण हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते......
बरेच काही विपरीत घडत होते, पण मनाला काही कळत नव्हते.......
अचानक डोळयांवर सुर्याचे किरण आले, अन् तिच्या प्रतिमेचे जणू दहनच झाले.......
क्षणभर काही कळलेच नाही, मनाला मात्र वळलेच नाही.....
काही कळायच्या आधीच...... "ओठातुन तिचे नाव निघू लागले......
डोळयांतुन अश्रु गळू लागले..... अन् हृदयाचे ठोकेही वाढू लागले...... "
पण......
नकळत तिची आठवण आली..... नकळत तिची आठवण आली...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top