का ग सखे रुसलीस... का ग सखे रुसलीस..
अशी एकटी का बसलीस..  कालच तर तू हसलीस..
अन माझ्या प्रेमात फसलीस.. एव्हड काय माझ चुकलं..
ज्यान हृदय तुझ दुखलं..अग काहीतरी बोल..
आणि ओठ तुझे खोल..अग सोड न तुझा राग..
अन काय पाहिजे ते माग...चंद्र मागशील तर चंद्र देयील..
सूर्य मागशील तर सूर्य देयील..वाटलाच तर सागरात उडी पण घेयील..
पण का ग अशी रुसलीस..अन अशी एकटी का बसलीस..
अस नकोना ग तू रडू..मला वाटतंय खूपच कडू..
तू जर नाही बोलणार..तर मी पण नाही जेवणार..
तू जर नाही बघणार..तर मी पण नाही जगणार..
अग थोडी तर कर माझी कीव.इथे जातोय माझा जीव..
सांग न ग.. का तू अशी रुसलीस.. अन अशी एकटी का बसलीस..
कालच तर तू हसलीस.. अन माझ्या प्रेमात फसलीस..
आता सोडून जाईल मी हे जग.. अन बस तू रडत मग..
नाहीतर दुसरा प्रियकर शोध.अन शांत कर तुझा क्रोध.
काय बी असो माझा गुन्हा..आता करणार नाही मी पुन्हा..
आता एकदा तरी गोड हास.आणि पूर्ण कर माझी आस...
का ग सखे रुसलीस..अशी एकटी का बसलीस..
कालच तर तू हसलीस अन माझ्या प्रेमात फसलीस...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top