"अजय आणि पूजा ह्यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण
नंतर अजयला दुसरी मुलगी मिळाल्यामुळे तो पुजाला सोडून गेला, पुजाला फार
वाईट वाटले, तिला हे दुख सहन होत नव्हते कारण तिचे प्रेम खरे होते ........
पुढे ४ वर्षांनंतर, अजय आपल्या मित्रांबरोबर माथेरान ला फिरायला गेला,
तिथे अचानक अजयला पूजा भेटली, अजयने पुजाकडे
तिला सोडून गेल्याबद्दल माफी मागितली, पूजाने मोठ्या मनाने त्याला माफ
केले. पुढे ६ दिवस ते एकत्र फिरले, भरपूर मजा केली, पूजा कडे मोठा कॅमेरा
होता, त्यांनी खूप सारे फोटो काढले .... तेव्हा, अजय :- पूजा फोटो खूप छान
आलेत, सगळे फोटो मला पाठव हं !! पूजा :- २ दिवसांनी माझ्या घरी फोन करून
आईकडून फोटो घे, कारण मी बाहेर जाणार आहे. २ दिवसांनतर ..... अजय ( फोनवर )
:- काकू फोटो पाहिजे होते, पूजा म्हणाली तुमच्याकडून घे !! काकू ( पुजाची
आई ) :- पूजा ???? अरे पुजाला जाऊन तर ४ वर्ष झाली !!!