खुप प्रेम करतो मी तिच्यावर.

खुप प्रेम करतो मी तिच्यावर,  अगदी खरं खरं अन् बेशुमार करतो,
पण
तिने ही करावं प्रेम म्हणून कधी जबरदस्ती नाही केली....
तिने दिला मला नकार, त्याचाही केला मी हसत हसत स्विकार,
मी समजु शकतो शेवटी तिलाही आहेच ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार...  
प्रयत्न करेन मी प्रेमाने तिच्या नकाराला होकारात बदलण्याचा,
प्रामानिकपणे प्रयत्न करेन मी तिचं मन जिंकण्याचा
पण ......का ?
नाही म्हणाली याचा विचार करुन स्वत:लाही मी बदलेन...
ती कितीही नाही म्हणाली तरी तिच्या नकारावरही मनापासुन प्रेम करेन,
नाही... नाही.... नाही... तिचं नाही... नाही... ऐकता ऐकता तिलाही
प्रेम करायला शिकवेन... पण स्वतःच्या हट्टा पाई घेणार नाही तिचा बळी,
काय मिळेल मला तोडून एखादी उमलणारी कळी...
मी मनापासुन खरे प्रेम करतो तिच्यावर, ठेवुन सच्ची निती,
माझे हे सच्चे रुप पाहून बदलेल तिचं मन....
करेलही एक दिवस ती माझ्या प्रेमाचा स्विकार...
कारण फक्त तिला मिळवळं म्हणजे प्रेम नसतो....
खरं तर ... खर्या प्रेमाला कधीच अंत नसतो...

खुप प्रेम करतो मी तिच्यावर,  अगदी खरं खरं अन् बेशुमार करतो,
 
खुप प्रेम करतो मी तिच्यावर. खुप प्रेम करतो मी तिच्यावर. Reviewed by Hanumant Nalwade on May 29, 2012 Rating: 5
Powered by Blogger.