तु येणार आहेस.

तु येणार आहेस...
तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, झाडावरली कोकिळा जेव्हा गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा जमिनीवरुन वाहु लागते...
 
तुझ्या प्रेमासाठीच मला मरणा नंतरही जगायचं आहे's photo.
 
 

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, सुगरिणीचं पिलु जेव्हा खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस याची मला चाहुल लागते, चंद्रासोबत चांदणीही जेव्हा अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस याची मला चाहुल लागते, भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी निरव शांतता पानोपानी, जेव्हा पसरु लागते...

Share on Google Plus

About Hanumant Nalwade