अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे
पलीकडे एक सुंदर पहाट फुलणार आहे
इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवली आहे
इतके दिवस या आठवणी दडपून टाकल्या होत्या
मग आजच का या पुन्हा आठवू पाहात आहेत?
उद्या काहीतरी घडणार आहे का?
माझ्या प्रिय व्यक्तीला काही होणार तर नसेल ना?
देवा, तिला नेहमी आनंदात ठेव
काढत नसेल माझी आठवण तरी सुखात ठेव
माझ्या आठवांच्या लहरी तिच्यापर्यंत पोहोचू नको देऊस
मन माझे रडले तरी तिला ऐकू नको येऊ देऊस
विसरून गेली मला तरी सुद्धा चालेल
पण भेट जर कधी झाली तर ओळख मात्र दाखव.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top