Showing posts with label जबरदस्ती नाहि का करु शकत. Show all posts
Showing posts with label जबरदस्ती नाहि का करु शकत. Show all posts

Monday, December 9, 2013

सोबती तूला पाहतो

असतेस समोर तू जेव्हा मी न माझा राहतो नभी सूर्य असल्या परी स्वप्नात तूला मी पाहतो... तू सोबत असते माझ्या जेव्हा मी न माझा राहतो नितळ पाण्याच्या झरया प्रमाणे तूझ्या मधे मी वाहतो....
लाजतेस नकळत मला पाहून जेव्हा मी न माझा राहतो तूझ्या हर्श चेहरया वरची मी खळी बनू मी पाहतो... . असतेस स्वप्नात तू जेव्हा मी न माझा राहतो सूखद आनंदाच्या प्रवासास सोबती तूला पाहतो...

Friday, August 26, 2011

विसरणं शक्य नसलं तरी

विसरणं शक्य नसलं तरी,
आठवण तुझी काढणार नाही.
भारावून जरी गेलो तरी,
नयनी आसवं दाटणार नाही.

...छळलंस किती तू मला तरी,
सवे तुज कोणी भांडणार नाही.
डोळ्यात उभे पाणी जरी,
थेंब एकही सांडणार नाही.

आग दु:खाची कोणत्याही,
अश्रूंच्या पाण्यानं विझत नाही.
तरीही दोन अश्रू पाझरल्याशि वाय,
मन मात्र हलकं होत नाही.