हे खरोखर प्रेम आहे .

तिचं - माझं अचानक भेटणं की एकमेकांच्या नजरेत हरवून जाणं ...
तिचं हळूवार लाजणं की माझं गडबडून जाण..
माझं शांत गाणं, की तिचं शब्द जोडणं..
माझं छान दिसणं, की तिचं आकर्षक असणं..
माझं चंचल मन, की तिचं संथ हृदय..
माझं हलकेच हसणं, की तिचं माझ्यात गुंतण..
माझं स्पर्श करणं, की तिचं मोहरून जाणं..
दूर असताना मला तिची आठवण येणं,
की माझं नेहमीच तिच्या सोबत असणं..
माझं तिला चिडवणं, की तिचं उगाच रागवणं..
मी दुसरीला बघितल्यावर तिचं जळणं,
की तिचं दुस-याशी बोलणंही मला सहन न होणं..
भेटल्यावर तिला वेळेचं भान नसणं,
की तिला लवकर घरी जाण्याची ओढ लागणं..
भांडण झाल्यावर माझं उदास होणं,
की तिचं सतत बेचैन असणं..
ती अन् मी कधी मित्र - मैत्रिण असणं,
की कधी त्याहून जास्त काहीतरी वाटणं..
हे खरोखर प्रेम आहे ?
की मैत्री ? की फक्त आकर्षण ?


तू सांग ना ग.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade