लग्न एक कैफियत..............

आयुष्यात चालताना माणसाला साथ हवी असते
म्हणुन तो लग्न करतो लग्न कसले एकप्रकारे विघ्नच करतो

नाही संसाराची जाण नाही सारं सांभाळण्याचं भान
गळ्यात पडले म्हणुन रेटत असतो संसाराचा गाडा चालवत असतो

लग्न म्हणजे काय ? याचं कुणाला आहे काय
लोक करतात म्हणुन आपणही करावं असं नाही तर तसं रडून पहावं

भांडी-कूंडी, मूलं-बालं याला तो संसार समजतो यातच सारं जीवन मौजमजेत घालवतो

लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला की समुद्राच्या वालुचा संसार वाटला
आलं मनात तर मोडून दिला नाहीतर भातुकली समजुन सोडून दिला

संसार म्हणजे काय ? लग्न म्हणजे काय? हे समजावून दाखवायची आली आहे वेळ
दोन जीवांचा खेळ करून मिलनाचा मेळ विश्वास आणि प्रेम याची करावी गोड घालमेल .
Share on Google Plus

About Hanumant Nalwade