वाटल नव्हत.

वाटल नव्हत ह्रदय तुटल तर इतक दुःख  सोसाव लागेल,
आज पर्यंत स्वासानी मला, पण  यापुढे त्याना पोसाव लागेल,

तुझ्या आठ्वानिच्या साखर  झोपेत, माझी कालची रात्र गोडव्यात सरली,
पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायच, पण  काल स्व्प्नानिच मनात जात्रा भरली,

प्रेम…. शब्द  दोन  अक्षरांचा, नुसता  एकला  तरी  हर्ष  होतो,
आणि  उच्चारला  तर दोन  ओठांचा  स्पर्श  होतो,

तुज्या  डोळ्यातला इवलासा  अश्रु, मला  समुद्राहून  खोल  वाटला,
कारन  मीच  होतो, म्हणून  माझ्या  डोळ्यात  समुद्र  दाटला,

माझे दुःख बघवत नाही, म्हणून एक ढग रदत होता,
तुमच आपल काही तरीच, म्हणे तेव्हा पाउस पडत होता..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade