Showing posts with label मलाही वाटत. Show all posts
Showing posts with label मलाही वाटत. Show all posts

Friday, August 16, 2013

वाटतंय

तुझ्यावर खुप प्रेम करावेसे वाटतंय
खुप दिवस गेले तुझ्या आठवणीत
आता तुला पाहावेसे वाटतंय...
तुझ्या प्रेमात मन गुंतवुन द्यावेसे वाटतय
अगदि खरं सांगतो तुझ्याशिवाय
जगु शकत नाहि आता फक्त मरावस... वाटतंय...

Thursday, August 15, 2013

मलाही वाटत

मलाही वाटत...
तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव..
मलाही वाटत..
तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहाव..
मलाही वाटत...
तू मला जवळ घ्याव,मीठी मारून मला घट्ट धराव..
मलाही वाटत...
तुझ्या बरोबर खुप भांडाव,भांडण मिटवून परत गोड व्हाव...
मलाही वाटत...
तुझ्या सुखात सामिल होऊंन घ्याव,मग त्यापेक्षाही तुला खुप सुख द्याव....
मलाही वाटत...
तुझ्या दुखात तुझ्या बरोबर रडाव,मग ते माझ्यावर घेउन परत तुला हसवाव..
मलाही वाटत...
तुझ्या बरोबर �कत्र बसून जेवाव,आणि जेवण माझ्या हाताने तुला भरवाव...
मलाही वाटत...
तुझ्या सोबत माझ नाव जोड़ल जाव,आणि ते नाव सर्वानी एकत्र घ्याव...
मलाही वाटत...
तुझा हात पकडून तुला घरी सोडायला जाव,तू गेलीस की तोच हात घेउन मी परत मागे
याव...
एकटा एकटा खुप रड़लोय ग मी,आता मला तुझ्या मांडीवर डोक ठेउन एकदा रडायाच आहे आणि जाण्यापुर्वी तुझा कुशीत शांत झोपून
मरायच आहे...