शेवटी त्या फ़क्त कविता...
राम आणि श्याम-राधा महाभारत आणि गीता
सारी पात्रच काल्पनिक शेवटी त्या फ़क्त कविता...
देवतांची युध्द सारे न्याय म्हणुनी सर्व मान्य
छेडतो कुणी गोपिकांना "रास" म्हणुनी सर्व मान्य
न्याय देतो कवीच सारे कल्पनांचा रास होता..
सारी पात्रच काल्पनिक ....
कर्म जेही देव करितो आज ते का मान्य नाही
पळविली स्त्री मंदिरातून मज मतिने स्तुत्य नाही
कृष्णकार्य कृष्ण करितो, तरीही तो का स्तुत्य होता?
सारी पात्रच काल्पनिक ....
नाव दिधले वेद काही मंत्र काही श्लोक काही
वाचण्या त्या फलश्रुतिही सुख काही शोक काही
यात कसले सुख सांगा? हाच मज तर शोक होता
सारी पात्रच काल्पनिक ....
शब्द माझे रोष भरले मतीने मूढ़ आहे
गुन्हे सारे माझे नाही ही रहस्य गूढ़ आहे
वा कदाचित या कवींना रहस्यांचा शोध होता..
सारी पात्रच काल्पनिक