माझे मरण.

माझे मरण

होता श्वासात तेव्हा, नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही, तेव्हा आले सगळे बघायला,
नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर, तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन, तर, आले सगळे टाहो फोडायला,
आज पहा माझा काय थाट! लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड, आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,
जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र, नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी, ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,
जन्मभर लाथा मारून गेले जे मला, आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी, आज चौघे-चौघे आले मला धरायला,
आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?, आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी, आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?
Share on Google Plus

About Hanumant Nalwade