तुझ्याविना.

तुझ्याविना माझी सगळी वस्तीच बकाळ झाली,

विचार करता करता न कळत सकाळ झाली..


जीवन आणी जीणे यातलेआता कळाले अंतर...

काही तु येण्यापूर्वी....काही तु गेल्या नंतर...!!!


तुझ्या घरावरून जातानाहल्ली तिकडे नजर वळत नाही...

मनाचे ठीक आहे गपण आसवांना काहीच कळत नाही.........


तुझा विचार करणं आता नकोसं वाटतं

अस म्हणून मन माझं मलाच फ़सवतं


कधी कधी मला वाटतंमी अजरामर असेन

झाली जर का जगबुडी तर तुमची वाट बघत बसेन


मला माहित नसलेलं दुःख माझ्या मनात साठून आहे

बरेचदा मी विचार करतो नक्की याचा ओघ कुठुन आहे


आनंदाचे क्शण लवकर संपतात आठवणी बनून मनात साठतात

हे दिवसही असेच संपतील आठवणी होउन पुन्हा बोचतील...

दीप मझ्या आठवणींचा जाशील तिथे सांभाळ

कोण जाणे आयुष्याची केव्हा होइल संध्याकाळ...


सुवर्णाच्या पावलांनी लक्ष्मी म्हणून नव्या घरात शिरायच

हातावरच्या पुसट होणार्‍या रंगासवे माहेराला विसरायचं....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade