लग्नाची पञिका

तिच्या लग्नाची पञिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची 'आसवे' पुसली....
एक 'अश्रु' नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव खराब होईल म्हणुन पुसनारा हाथ अडला...
दोन_चार थेँबं तिच्या 'आईच्या' नावावरही पडली होती,
जिच्याकडे हाथ पसरवून ती माझ्यासाठी रडली होती.
काही घसरलेली आसवे 'लग्नस्थळ' दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची 'भेटायची जागा' होती....
'आहेर आणु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या 'बर्थ_डे' साठी मी माझा मोबाईल विकला होता...!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade