मधुबन ..........
आभाळ होउन बरसला, त्याने वर्षाव प्रेमाचा केला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
अपूर्व सुख लाभले, चांदण्यात घेउन गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
स्पर्शात हरवले मी, बेधुंद करुनी गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
नजरेनेच आज तो, स्पर्शुन देह गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
फूल आज जाहले मी, भ्रमर तो ही झाला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
सहवास आज त्याचा, मज उमलवून गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
आभाळ होउन बरसला, त्याने वर्षाव प्रेमाचा केला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
अपूर्व सुख लाभले, चांदण्यात घेउन गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
स्पर्शात हरवले मी, बेधुंद करुनी गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
नजरेनेच आज तो, स्पर्शुन देह गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
फूल आज जाहले मी, भ्रमर तो ही झाला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!
सहवास आज त्याचा, मज उमलवून गेला,
माझी न राहिले मी, मधुबनात घेउन गेला!