हरवले चांगले क्षण... हरवल्या आठवणी...सार भूललोय मी...
आज या वाटेवर एकटा... विचारांत गुंतलोय... तेव्हा जाणवतय....
एकटा फक्त एकटा उरलोय मी...

कधी सर्वांत पुढे जाण्यासाठी धावत पळत गेलो...
कधी स्वार्थापायी चुकीच्या प्रवाहात वाहत न्हाहत गेलो...
कसला हव्यास होता कोण जाणे...
धारधार शब्दांनी कधी नात्यांच झाड...कधी मनाच पान छाटत छाटत गेलो...

हवहवस वाटणारं सार काही कमावलं...
आणि...
आणि मग छाती फुगवून सार्या जगाला सांगाव...
म्हणून मागे वळून पाहिलं...

तेव्हा उमगलं...
हरवले चांगले क्षण... हरवल्या आठवणी...
एकटा फक्त एकटा उरलोय मी...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top