बोल एकदा तू माझी होती.

वादळ वादळ चक्रीवादळ...आयुष्यातले काळे बादल...
नकळत आले असे पसरले...जीवन झाले कातळ कातळ...

तिने सारले दूर लोटले...अवचित अघटीत सारे घडले...
श्वास कोंदला... झाला अंत... कसली इच्छा न कसली खंत...

सोडून जेव्हा मजला गेली नभ कोसळले हलली धरती...
काळजातही आग उसळली काळोख दाटला डोळ्यांभवती...

येईल येईल कधी परत ती माहित नाही याचे उत्तर...
सरले जगणे... आटला सागर... मरणही आले... तरी बहत्तर...

ये ना ये ना काळीज बोले... गहिवरून डोळे... झाले ओले...
तेवित ठेवीन... प्रेमाची ज्योति.... बोल एकदा तू माझी होती...

बोल एकदा तू माझी होती...
बोल एकदा तू माझी होती. बोल एकदा तू माझी होती. Reviewed by Hanumant Nalwade on July 14, 2012 Rating: 5
Powered by Blogger.