तुझ्या हसण्याला सखे मी काय देवू नाव?...
चुके काळजाचा ठोका..होती मनावर घाव...
तुझ्या नजरेत आहे भावनांचं छान गाव...
अशा भावनांच्या बागेमध्ये फुलांनी फुलाव...
अशा फुलांच्या वाटेने तुझ्या गावात शिरावं...
विसरावं मी स्वतःला अन् तुझ्यात रुजाव...
तुझा अंश मी होईन असा रुजेन तुझ्यात...
रोमरोमात शिरून सखे थिजेन तुझ्यात....
तुझ्या पाणेरी डोळ्याचे निळे गहिरे तळे...
बहरला वसंत तयांत...डुले हिरवे मळे...
तुझ्या हसण्याला सखे काय मी बोलाव?...
धो धो हसण्यात तुझ्या...पावसानेही भिजावं...
तुझा होऊन मी सखे तुझ्यात उरावं...
तुझ्या नजरेच्या काठी गाव माझ ही वसावं...