Tuesday, November 26, 2013

एकाच ठिकाणी नसतो रे...

एकदा मी प्रेमाला विचारले  कुठे कुठे तू असतोस रे ?
प्रेम मला हसून म्हणाला.. अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

जेव्हा तुला कोणी आवडतो.. मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त माझाच करतो  कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

प्रेम तू कुणावरही कर.... मी तुला तिथेच दिसणार असतो रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील... त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

आयुष्य खरच खूप सुंदर आहे.. माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार.. मी तुझ्याच हृदयात लपून असतो
Reactions: