Tuesday, October 15, 2013

शेवटची भेट

तुला नको असले तरी मला शेवटचं भेटायचं आहे तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायच
आहे ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांतआणायचं नाही पाणी पण माहिती आहे भेटल्यावर अश्रुशिवाय बोलणार नाही कुणी खूप काही बोलायच आहे खूप काही सांगायचं आहे मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे तुझ शेवटच चित्र मनात रंगवायच आहे हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून
मनाला समजवायच आहे जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे एकदा मिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजवायच आहे.
Reactions: