जितकी ओढ मला तुझी ..तितकीच तुलाही आहे का...? जितके प्रेम माझे तुझ्यावर तितकेच तुझेही आहे का.....?
मी समोर नसतानाही मला कधी पाहतोस का.....? एक क्षणी मी दिसावं म्हणून व्याकूळ होतोस का.....?
मी समोर नसतानाही मला कधी पाहतोस का.....? एक क्षणी मी दिसावं म्हणून व्याकूळ होतोस का.....?
तो क्षण संपूच नये, असा विचार कधी करतोस का....? एकांती आपल्या गुजगोष्टी आठवून कधी पाहतोस का?
त्यातल्या प्रतेय्क शब्दाने मोहरून कधी जातोस का? माझा वेडेपणा पाहून स्वताशी कधी हसतोस का?
माझ्यासोबत वेडे व्हावे असे कधी ठरवतोस का ? जितके प्रेम माझे तुझ्यावर तितकेच माझ्यावर करतोस का ..