Monday, November 25, 2013

ती मुळात भांडतेचं त्यासाठी

तो आणि ती... भांडले दोघं... ती रागवली अन रुसून बसली... ती रागवल्यावर इतकी छान  का दिसते हे त्याला न सुटणार  कोडं... ... तीही मग मुद्दाम रुसून बसते... तो ही थोडावेळ चिडचिड  करतो... पण ती रुसली म्हटल्यावर  त्याची नीट चिडचिडही होतं  नाही... मग तो उगाच तिला आवडेल असं  काहीतरी करतो...
उलटसुलट बडबडतो... वाकडेतिकडे चेहरे करतो... मग असंच  कुठल्यातरी एका क्षणी ती खुदकन हसते..  तिच्या त्या रागवल्यानंतर  जास्त छान दिसण्याच कारण "कोणीतरी " आपलं " आपल्याला मनवण्यासाठी हे  सगळं करेल हा ' विश्वास ' !!!! ती मुळात भांडतेचं त्यासाठी...."♥♥
Reactions: