Monday, November 25, 2013

एक जीव आहोत आपण

मनातले भाव जाणलेस तु माझ्या, दिलेस सुखाचे अनमोल क्षण.....
हा प्राणही तुझाच आहे गं वेडे, तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण.....
माझ्या प्रत्येक कवितेत नकळत येतेस तु,वेड  लावतेस जिवाला बेचैन करतेस मन.....
अशी नको ना रागवत जावूस माझ्यावर, तुच नाही समजणार तर मला समजेल कोण....

नको ना रुसुस नको ना रडूस असे, तुझ्या अशा वागण्याने दुःखते गं मन.....
मी तुझा तु माझी कोणी नसलो तरी, दोन शरीर एक जीव आहोत आपण.....
दोन शरीर एक जीव आहोत आपण.........
Reactions: