Monday, September 23, 2013

जा माझ्याशी बोलू नकोस

ती :- काय रे कुठे होतास ?? किती फोन केले  मी तुला उचललेस का नाही ??ठीक आहे
नाही उचललास माझा फोन... मग कॉल बॅक  तरी का नाही केलास कि माझ्या मॅसेजला रिप्लाय
नाही दिलास, आता पण मीचं बोलतेय  एका तरी प्रश्नच उत्तर दे.....
तो :- बघत होतो जर कधी मी अचानक फोन  नाही उचलला, मॅसेजला रिप्लाय नाही दिला
तर तुझी अवस्था काय होते... छान वाटल  कुणाची नाही इतकी माझी तू काळजी
करतेस...पण खर सांगू चिडलेल्या सुरात मला जाब  जेव्हा तू विचारतेस तो क्षण मला खूप
आवडतो.... माझ्या खांद्यावर भराभर  चापट्या मारून तू तुझा राग शांत करतेस
त्या चापट्यांचा आवाज आणि तुझा स्पर्श  मला खूप आवडतो... तुझ्या हातचा मार
खाल्ला असतो मी आणि तू माझ्या  मिठीत येवून रडतेस, थरथरणा-
या ओठांनी पुन्हा कधी अस करू नकोस  मला बजावतेस  तो तुझा अधिकार गाजवण्याचा स्वर मला खूप
आवडतो... म्हणूनच कधी कधी मी  मुद्दामच तुला काहीच रिप्लाय देत नाही...
ती :- तूsssssssssssssss नाsssssssssssssssssssss नालायक आहेस एक
नंबरचा.... जा माझ्याशी बोलू नकोस....!
Reactions: