तशी ओळख आमची जुनीच होती पण त्या दिवशी आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती. तिच्या काळजाची हुरहूर, माझ्या मनाला जाणवतच होती . कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .
कुठूनतरी वाऱ्याची झुळूक हळूच आली होती तिच्या केसांशी काहीतरी गुज करून गेली होती सूर्याच्या त्या तेज ऊन्हात ती जणू बाहुलीच दिसत होती कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .
आमची नाजराला नजर भिडत नव्हती तिच्या ओठांची सवड अजून काही खुलली नव्हती पण…. तिच्या सहवासाने मी आणलेली केवड्याची कळी मात्र छान फुलली होती . कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .
उन्हे क्षितिजाच्या कुशीत कधीच शिरली होती चंद्राने हि सूर्यावर कधीचझेप घेतली होती नाव हितिच्या बंदराशीपोहचली होती पण ..... ती अजून वाळूतचखेळत बसली होती कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .
कारण आठवत नाही, पण त्या दिवशी तीखूप रडली होती कदाचित माझ्याच हातांनी अश्रू पुसावे असा वेड्या मनाशी हट्ट करून बसली होती . कारण ..... आमच्या प्रेमाची ती पहिलीच भेट होती .